राज्य भरात सध्या परिक्षेच वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता 12 वीची परिक्षा 18 फेब्रुवारी म्हणजेच उद्यावर येऊन ठेपली आहे. तर 18 मार्चला परिक्षा संपणार आहे. यंदाच्या परिक्षेत राज्यातील एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले आहेत. (हेही वाचा : परीक्षेला जाताना या गोष्टी करायला विसरू नका!)
परिक्षेच्या कालावधीत विद्यार्थांना अनेक वेळा मदतीची गरज भासते. त्यामुळे मंडळाने विद्यार्थ्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकावरून तुम्हाला हवी ती मदत मिळणार आहे. तर पाहुयात घोषित केलेले विभागीय मंडळांचे हेल्पलाइन क्रमांक…
(हेही वाचा : पालक हो…विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण असा घालवा!)
>> पुणे – 7038752972
>> नागपूर – (0712) 2565403 / 2553401
>> औरंगाबाद – (0240) 2334228 / 2334284 / 2331116
>> मुंबई – (022) 27881075 / 27893756
>> कोल्हापूर – (0231) 2696101 / 2696102 / 2696103
>> अमरावती – (0721) 2661608
>> नाशिक – (0253) 2592141 / 2592143
>> लातूर – (02382) 251733
>> कोकण – (02352) 228080
बारवीच्या परिक्षेच वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा…
यावर सक्तीची मनाई
काही वेळा परिक्षेला जाताना काय घेऊन जावे आणि काय घेऊन जायला मनाई आहे हे विद्यार्थांना कळत नाही. त्यामुळे परिक्षेला जाताना मोबईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोबाइलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही, याची नोंद घ्यावी असे मंडळांनी सांगितले आहे.