नोकरदार वर्ग ते व्यवसायिक, कलाकार पासून क्रिडा क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थ्यांसह गृहीणीसाठी हा आठवडा कसा असेल. जाणून घ्या कसा असेल तुमचा हा संपुर्ण आठवडा. त्यासाठी संपुर्ण आठवड्याच राशी भविष्य.
मेष :
हा आठवडा तुमच्यासाठी अधिक परिश्रमाचा राहिल. मात्र श्रमातून केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला मिळेल. आपणास व्यवहारात दक्ष राहावे लागेल, अन्यथा घाईघाईत घेतलेले निर्णय आपल्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कार्यात अतिरिक्त खर्च किंवा आर्थिक तोटा होण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापाराशी संबंधित अधिक काळजी घ्या. व्यावसायिक व आर्थिक आघाडीवर तणावाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या शेवटी काही शुभ संकेतही मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ :
कोणताही महत्वाचा निर्णय घेताना कुटूंबियांचा सल्ला जरुर घ्या. ग्रहांची अनुकूलता लाभणार असल्याने निराश होण्याची गरज नाही. कामात हळुहळु प्रगती करण्याकडे आपला कल आहे तो तसाच राहु द्या. कामाबाबत कोणावरही विश्वास ठेवण्याचे टाळावे विद्यार्थ्यांना अनुकूल- प्रतिकूल परिस्थिती असल्याचे जाणवेल. अभ्यासात एकाग्रता वाढवावी लागेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम असून एखादी सुवर्णसंधी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन :
क्रिडा तसेच राजकारणाच्या क्षेत्रातील मंडळींना हा आठवडा चांगला जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्घ होतील. तर काहींना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्साहाच्या भरात घरातील वातावरण बिघडणार नाही याची या आठवड्यात काळजी घ्या. एखादा कौटुंबिक वाद होण्य़ाची शक्यता आहे. शक्यतो बोलण टाळा. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना आणि परदेशी जाण्याच्या संधी असणाऱ्यांसाठी काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
कर्क :
हा आठवडा तुमच्यासाठी काहीसा तडजोडीचा ठरणार आहे. नवी गुंतवणुक किंवा नव्या गोष्टी करण्याची पुर्व तयारी करा, मात्र प्रत्यक्ष कामास सुरवात करणे या आठवड्यात शक्यतो टाळा. अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे, तेंव्हा खर्चाच निट नियोजन करा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासामुळे प्रकृतीच्या तक्रारी उद्भवु शकतात. चिडचिड होण्याची शक्यता आहे. मात्र शांतता हाच त्याच्यावरचा योग्य उपाय ठरेल.
सिंह :
सिंह राशीच्या मंडळींना आठवड्याची सुरवात चांगली होणार आहे. रखडलेली अनेक कामी मार्गी लागण्याची, किंवा त्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्यास ग्रहमान अनुकुल राहील. जोडीदाराच्या शोधात असलेल्यांना आणखी शोध घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांना श्रमाचे योग्य फळ मिळू शकेल. उत्तरार्धात नवीन जवाबदारी संभाळण्यासाठी तयार व्हाल कौटुंबिक वाद आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. तसेच प्रकृतीच्या तक्रारी देखील काहीश्या वाढतील.
कन्या :
हा आठवडा कला क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धीचे वलय प्राप्त होण्याची शक्यता राहील. खर्चाचे प्रमाण या आठवड्यात काहीसे वाढणार आहे, तेंव्हा योग्य पद्धतीने नियोजन करा. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण असल्याने आणि जागरणामुळे आरोग्याच्या समस्या उदभवण्याची शक्यता आहे. शुल्लक काराणांवरुन काही वाद ओढवण्याची शक्यता आहे. मात्र या आठवड्यात तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ लाभणार आहे. घरातील वातावरण चांगले राहील.
तूळ :
या आठवड्याचे ग्रहमान चांगले असले तरी काही गोष्टींचा अवश्य विचार करावा. प्रथमत: आपल्या रागावर व बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आणि महत्वाचे निर्णय घेतांना जेष्ठांचे तसेच अऩुभवी व्यक्तींचा सल्ला जरुर घ्यावा. सामाजिक कार्यात असणाऱ्यांना हा आठवडा चांगला जाणार आहे. ह्या आठवड्यात एकंदरीत आपले आरोग्य उत्तम राहिले, मात्र कामा बरोबरच शरीराला योग्य विश्रांती देखील द्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले लक्ष लागून उत्तम प्रगती साधता येईल. या आठवड्यात तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
वृश्चिक :
हा आठवडा आरोग्य, व्यवसाय आणि नोकरी अशा सगळ्या बाजुंनी उत्साही आणि लाभदायी असणार आहे. नोकरीची अपेक्षा करणाऱ्यांना बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता राहील. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, सामाजिक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळण्याची शक्यता. राजकीय तसेच कलाकार मंडळींनाही हा आठवडा उत्तम ठरणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबासाठी वेळ द्या. वैवाहिक जोडीदाराची तुम्हाल उत्तम साथ मिळेल.
धनू :
कामाचा व्याप वाढणार आहे. मात्र तरीही कामातील उत्साह चांगला राहील. स्पर्धा परीक्षेमध्ये आपणास यश मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यास कोणत्याही प्रकारे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामात अपेक्षित यश मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाजु उत्तम राहील. त्या अऩुशंगाने खरेदी देखील होईल. विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी आभ्यासाचा कंटाळा येण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा धनु राशीच्या मंडळींना चांगला जाईल.
मकर :
आपला साडेसातीचा काळ सुरु असल्याने अधिक काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहेच. तुम्ही आता केलेल्या मेहनतीचे अपेक्षित फळ आणि भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळवू शकाल. वाहनांवरील वेगावर नियंत्रण ठेवा. लॉटरी, शेअर्स या गोष्टींपासून दूर राहणे हितकारक ठरू शकते. व्यवसायात सध्या मोठी गुंतवणूक करण्याचे टाळा. प्रत्येक अडचणीचा सामना खचुन न जाता धैर्याने करा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असल्याने अभ्यासातील गोडी वाढेल. मात्र, आठवड्याच्या मध्यास काही अडचणी येऊ शकतात.
कुंभ :
नोकरदार तसेच व्यावसायिक मंडळींसाठी हा आठवडा आर्थिक दृष्या चांगला आणि लाभदाई जाईल. अभ्यासात एकाग्रतेच्या अभावामुळे परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. आठवड्याच्य़ा शेवटी आरोग्याची तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांचे कार्यालयात वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध राहतील, तसेच स्वतःच्या कामाच्या जोरावर कार्यालयात इतरांना प्रभावित करता येईल. तुमच्या प्रिय जनांबरोबर या आठवड्यात तुम्ही वेळ घालवाल.
मीन :
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य स्वरुपाचा राहणार आहे. वातावरणातील बदलांचे तुमच्यावर आठवड्य़ाच्या सुरवातीला परिणाम होतील. त्यामुळे चिडचिड, वाद होण्याची शक्यता आहे. काहीसा उत्साह कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याच्या शेवटात तुम्ही परिस्थितीशी जुळवून घ्याल. नव्या योजना सध्या लांबणीवर टाकाव्यात. प्रकृती सामान्य राहील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. आर्थिक व्यवहार काळजीपुर्वक करावे. तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो.