सोशल मीडियावर सध्या ‘टिक टॉक’ या व्हिडिओ अॅपची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. थरारक स्टंटबाजी करून व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा लागलीच तरूणाईमध्ये दिसते. मात्र, या थरारक व्हिडिओ बनविताना आपला जीव धोक्यात येऊ शकतो याचा विचारही तरूणांच्या मनाला शिवतही नसल्याचे पाहायला मिळते. अशाच एका तरूणाच्या जीवावर बेतल्याचा टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ दिवा ते मुंब्रा स्थानका दरम्यानचा असून धावत्या रेल्वेतून धोकादायक व्हिडिओ काढताना एक तरूण थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे.
व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरूण धावत्या रेल्वसह स्टंटबाजी करत असताना त्याचा तोल गेला व लोकलच्या पायऱ्यातून खाली पडला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नसून थोडक्यात या तरूणाचा जीव वाचला आहे. या व्हिडिओ पाहून अनेकांचा हृदयाचा धोका नक्कीच चुकला असेल. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून या स्टंटबाजाच्या मुसक्या आवळण्यासाठी आरपीएफच्या कारवाईसह विशेष मल्टिमीडिया जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र असे असूनही स्टंटबाजी करणारे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे यापुढे असे प्रकर थांबविण्यासाठी ठोस कारवाई करणे गरजची आहे.