प्रत्येक मुलीला सुदर दिसण्यासह जबरदस्त फिगर असावी अशी इच्छा असते. मात्र काहींचे फिगर आधीच छान असते, मात्र काहींना तस फिगर मिळवता येत नाही. अशा फिगरसाठी तुम्हाला खास तुमच्या आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात जबरदस्त फिगर बनवण्याचे काही खास टिप्स.
डाएट प्लॅन :
- ताजं अन्न खा : जर आपल्याला आपलं वजनच नाही तर आरोग्य सुद्धा चांगलं ठेवायचं असेल तर आपण नेहमी ताजं अन्न खावं.
- गोड पदार्थ टाळा : जर आपल्याला गोड खाण्याची खूप इच्छा झाली तर किसमिस, खजूर, मनुका इत्यादींचं सेवन करावं. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि यामुळे त्वचा सुद्धा चांगली राहते. तसंच साखरेऐवजी मध, ऑर्गेनिक गुळ, नारळाचा गुळ किंवा खजूरचा वापर करावा.
- व्हिटॅमिन ‘सी’चा वापर वाढवावा : आपण असा आहार घ्यावा जो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ अधिक खावेत. यामुळे पचनशक्ती वाढते,आहारात लिंबू, संत्र, आवळ्याचा वापर करावा.
- फायबर असलेले पदार्थ आहारात वाढवावेत : सलाद आणि फायबर युक्त पदार्थांचं प्रमाण खाण्यात वाढवावं. यामुळे आपलं वजन कमी करण्यात फायदा होतो. कडधान्य आणि भाज्यांचं सूप, सलाद आणि फळांचं सेवन यासाठी करावं. यामुळे आपलं शरीर खूप चांगलं काम करतं.
- झोप पूर्ण घ्यावी : प्रत्येकासाठीच कमीतकमी ८ तास झोपणं गरजेचं आहे. कमी झोप झाली तर वजन वाढण्यासोबतच चिडचिड होते आणि चेहऱ्यावरही तणाव दिसून येतो. चांगली आणि पूर्ण झोप झाल्यावर त्वचा आणि मूड दोन्हीही फ्रेश दिसतात.