Ads
व्हायरल व्हिडिओ

शिवरायांवरचा Tik Tok व्हीडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय!

डेस्क desk team

देशभरातील तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच व्हिडीओद्वारे वेड लावण्याऱ्या टीकटॉक या मोबाईल अ‌ॅपवर आता एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नववारी साडीतील एका तरुणीचा हा टीकटॉक व्हिडीओ लाखो लोकांच्या व्हॉट्स अ‌ॅपच्या स्टेटसवर धुमाकूळ घालत आहे.

काय आहेत व्हिडीओत? 

या व्हिडीओमध्ये नववारी नेसलेली तरुणी पारंपारिक अलंकार परिधान करुन रस्त्याने चालत जाताना दिसत आहे. तिच्या समोर येऊन अनेकजण मुजरा करताना, दर्शन घेताना दाखवण्यात आले आहेत.

पहिल्या काही सेकंदात जिजाऊच्या लेकीला मुजरा घालत असल्याचं जाणवत. मात्र काही सेकंदानंतर कॅमेरा पुढच्या बाजूने दाखवताच त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असते. शिवरायांच्या मूर्तीला पाहून सर्वजण नतमस्तक होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणारी शिवजयंती हे या व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं खास कारण आहे. शिवप्रेमींचा या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: