चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे १७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र असलेल्या वुहान येथून विषाणूंचा संसर्ग जवळजवळ २५ देशांमध्ये पसरला आहे. हा रोग प्राण्यांना होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.
प्राण्यांना मास्क : कोरोनाचा धसका अनेक पाळीव प्राण्यांच्या मालकांनी घेतला असून, चक्क कुत्रे व मांजरांना देखील चीनमध्ये मास्क लावले जात आहेत.
A cat wearing face mask in #China amid #WuhanCoronavirus outbreak. pic.twitter.com/ZU3H3KTLAw
— W. B. Yeats (@WBYeats1865) February 10, 2020
जागतिक आरोग्य संघटना : प्राण्यांना या व्हायरसचा संसर्ग होईल याचा काहीही पुरावा नाही. मात्र असे असले तरी देखील चीनमधील नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना मास्क लावताना दिसत आहेत. चीनचा राष्ट्रीय आरोग्य आयोग मात्र जागतिक आरोग्य संघटनेशी सहमत नाही. प्रवक्ते आणि संसर्गरोगतज्ञ ली लँनजुन यांच्यानुसार, जर पाळीव प्राणी बाहेर आले व त्यांचा या संसर्ग असलेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्यास प्राण्यांनादेखील संसर्ग होऊ शकतो.
EVEN A DOG IS WEARING A FACE MASK DUE TO THE CORONAVIRUS OUTBREAK IN CHINA pic.twitter.com/UEtYa7ICFP
— freezerohedge (@freezerohedge1) February 7, 2020
सल्ला : पाळीव प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे असून वर्ल्ड स्मॉल एनिमल व्हेटेरनिटी असोसिएशनने सर्व मांजरीच्या मालकांनादेखील आपल्या प्राण्याला काही दिवस घरातच ठेवण्याचा सल्ला दिला आहे.