बातमीदार टीम – अनेकांना ‘मुर्ख’ बनवून काहीसा आनंद निर्माण करण्यासाठी ‘एप्रिल फुल’ हा दिवस तरुणाईमध्ये साजरा केला जातो.
पण तुम्हाला ‘एप्रिल फुल’ या दिवसाची सुरुवात कशी झाली, हे माहीत आहे का ?
- फ्रान्समध्ये काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करतात आणि त्यांना ‘एप्रिल फूल’ म्हटलं जातं. 1582 मध्ये पोप चार्ल्सने जुन्या कॅलेंडरच्याऐवजी रोमन कॅलेंडर सुरु केले होते.
- 1539 मध्ये फ्लेमिश कवी डे डेने यांनी एका गोष्टीत असं लिहिलं होतं की, एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या सर्व नोकरांना एक एप्रिलच्या दिवशी मुर्खपणाच्या कार्यक्रमाला पाठवले होते, म्हणून हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो.
- फ्रान्स, इटली, बेल्जियममध्ये कागदाचे मासे बनवून लोकांना चिकटवले जातात आणि त्यांना एकप्रकारे मुर्ख बनवले जाते.
- इराणी-पारसी नववर्षाच्या 13 व्या दिवशी एकमेकांना मुर्ख बनवत हा दिवस साजरा करतात. डेनमार्कला 1 मे या दिवशी एप्रिल फूल साजरा केला जातो.