Ads
स्पोर्टस

या क्रिकेटरला पाचवे ‘कन्यारत्न’

डेस्क desk team

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि एकेकाळी आपल्या तुफानी खेळीसाठी क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेला अष्टपैलु खेळाडु शाहीद अफ्रिदी याला पाचवी मुलगी झाली आहे. शाहीद आफ्रिदीने त्याच्या या मुलीसोबचा फोटो व्टिटर तसेच इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. दरम्यान, शाहीद आफ्रिदीला अन्शा, अज्बा, अमारा आणि अक्शा अशा चार मुली आहेत. आपल्याला आधीच चार मुली असून, मी अल्लाचे आभार मानतो त्याने मला आणखी एक मुलगी दिली. मी माझ्या 5 व्या मुलीच्या जन्माने खुप खुश आहे. या फोटोच्या माध्यमातून माझ्या चाहत्यां सोबत मी ही आनंदाची बातमी शेअर करत असल्याच त्याने कॅप्शन या पोस्टला दिले आहे

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

दरम्यान, शाहीद आफ्रिदीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. फॅमिली प्लानिंग कर, तुला फॅमिली प्लानिंगची गरज आहे, बायकोचा विचार कर अशा कमेंट काहींनी केल्या आहेत. तर अनेकांनी फुटबॉल टिम तर झाली, शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का? निरक्षर कुठला!’ ‘तुला कुटुंब नियोजनाची गरज आहे’ असे सल्ले देत आफ्रिदीला ट्विटरवर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.

मुलांबदल आत्मचरित्रात काय म्हणाला होता

2019 साली त्याने प्रसिद्ध केलेल्या गेम चेंजर या त्याच्या आत्मकथेत आपण कधीही आपल्या मुलींना क्रिकेट खेळु देणार नाही. त्यासाठी काही धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत. माझ्या या निर्णयावर कोणी काहीही म्हणो,पण मी माझ्या मुलींना आऊट डोअर गेम खेळु देणार नाही असे त्याने म्हंटले होते. शाहीद आफ्रिदीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली असून, आगामी पाकिस्तान टी-20 लीग साठी तो खेळणार आहे किंवा नाही हे त्याने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: