Ads
ओपन मांईड

परीक्षेला जाताना या गोष्टी करायला विसरू नका!

ssc-exam
डेस्क desk team

परीक्षेला जाताना विद्यार्थांच्या मनात पेपर कसा जाईल? या विचाराने थोडी भीती, उत्साह, धडपड अशी काहीसी गोंधळलेली परिस्थिती असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण परिक्षेला जाताना उद्भवू नये यासाठी आज आम्ही परिक्षेला जाण्या अगोदर काय तयारी करायला पाहिजे हे सांगणार आहोत.

हे केल्यास तारांबळ उडणार नाही

>> पेपरच्या आदल्या दिवशी आपली बॅग भरून तयार ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला पेपर लिहिताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आयत्यावेळी विसरणार होणार नाही.

>> परीक्षेच्या दिवशी केंद्रवर जाताना एकापेक्षा जास्त पेन, ब्लाक बॉलपेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी आणि आवश्यक असणारे इतर साहित्य घेऊन जावे. आपल्याकडे स्वत:चे या सर्व गोष्टी असल्यास म्हणजे कुणाकडे मागायची वेळ येणार नाही.

>> एकापेक्षा जास्त पेन आपल्या सोबत ठेवावेत अचानक पेन फुटला किंवा लिहायचा बंद झाला तर दुसरा पर्यायी पेन जवळ असावा.

>> आपल्या शाळेचे आयडीकार्ड आणि हॉलतिकीट दोन्ही आपल्यासोबत ठेवा.

>> तसेच सोबत स्वत:ती पाण्याची बाटली घ्या. परीक्षा केंद्रात थोड्या वेळाने घोटभर पाणी प्यावे. म्हणजे झोप येणार नाही आणि मेंदूही तल्लख राहिल.

>> रायटिंग पॅड घेणार असाल तर शक्यतो ते ट्रान्सपरंट असेल याची काळजी घ्या. अन्यथा ते सभागृहात नेण्यास परवानगी दिली जात नाही.

>> आपल्याला लागलेले परिक्षा केंद्र लांब आले असेल तर आपण आपल्यासोबत असलेल्या पेपरच्या वह्या पुस्तके घेतो. पण तसे करू नका. शेवटच्या क्षणी वाचून काही होत नाही आणि डोक्यात असलेलंही विसरायला होत. त्यामुळे मनातल्या मनात स्मरण करा.

>> परीक्षेला जाताना घरातून गोड खाऊन निघावे. त्यामुळे अंगात ऊर्जा निर्माण होते. पोटभर खाऊन पेपरला गेल्यामुळे भुक लागत नाही किंवा भुकेने पेपर लिहिण्यास बेचैन येत नाही.

>> परिक्षा केंद्र लांब असो वा जवळ परीक्षागृहात अर्धातास आधी पोहचले पाहिजे. तिथे गेल्यानंतर उत्तर पत्रिकेत कसल्याही प्रकराची  खाडाखोड न करता भरावी आणि शांत चित्ताने बसून राहावे. आजचा पेपर मला खूप चांगला जाणार आहे आणि मला सगळे आठवणार आहे असे मनोमन चिंतावें आणि हाती पेपर आल्यावर शांतपणे वाचून सोडवायला सुरुवात करावी. सकारात्मक विचार करून पेपर लिहिण्यास सुरूवात केल्यास. परिक्षा योग्य रित्या पार पडेल.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: