Ads
जरा हटके

साईबाबा मंदिरात 8 लाख दान देणारा असाही ‘भिकारी’

beggar donate 8 lakh in temple
डेस्क desk team

मंदिराच्या बाहेर बसुन भीक मागणाऱ्या एका 73 वर्षीय वृद्धाने चक्क 8 लाख रुपये दान केले आहेत. आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील साई मंदिराच्या बाहेर बसुन हा भिकारी भीक मागायचा. याच भिकेतून गोळा केलेले थोडे थोडके नव्हे तर तब्बल 8 लाख रुपयांचे दान गेल्या सात वर्षांत त्याने केले आहे. यादी रेड्डी असे या भिकाऱ्याचे नाव असून, त्याने दान केलेल्या या पैशांच्या माध्यमातून एक गोशाला बांधण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तसेच या भिकाऱ्यावर मंदिर प्रशासनासह सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दान दिल्याने उत्पन्न वाढले

मुख्य म्हणजे आपण जसजसे दान करत गेलो तस तशी आपल्या उत्पन्नात देखील भर पडत गेल्याचे या भिकाऱ्याने सांगितले आहे. सर्व प्रथम त्यांनी मंदिर प्रशासनाला 1 लाख रुपये दान स्वरुपात दिल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे ते अधिपासून भिकारी नव्हते. तर भिकारी होण्या आधी तब्बल आयुष्याची चाळीस वर्षे ते रिक्षाचालवत होते. मात्र कालांतराने त्यांना गुडघे दुखीचा त्रास सुरु झाला. त्रास इतका असहाय्य झाला की त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी मंदिरा समोर बसुन भीक मागण्या खेरीज पर्याय उरला नाही. अखेर त्यांनी भीक मागण्यास सुरवात केली. आपल्या उर्वरीत आयुष्यात मिळणारी सगळीच रक्कम आपण दाण करणार असल्याचेही यादी रेड्डी यांनी सांगितले.

सुरवातील 1 लाख दान करणाऱ्या रेड्डी यांची तब्येत अधिक बिघडु लागल्यावर त्यांनी आणखी दान करण्याच निर्णय घेतला. त्यांच्या या दान करण्याच्या वृत्ती मुळे त्यांना मंदिरपरिसरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. असे आतापर्यंत त्यांनी 8 लाख रुपये दान केले आहेत. भारतात श्रद्धा आणि देवाला मानणारा खुप मोठा वर्ग आहे. अनेक लोक पायी, अनवाणी हजारो मिटरच अंतर कापुन तसेच तासंतास रांगेत उभे राहुन देवाच्या मुर्तीचे दर्शन घेतात. मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्षता असलेल्या भारतात विविध जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या मंदिरात श्रद्धेपोटी जात नतमस्तक होतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: