न्यूझीलंड दौऱ्यातील टी-20 मालिका भारताने 5-0 अशी जिंकली असली तरी त्यानंतर पार पडलेल्या वन डे मालिकेत भारताचा न्यूझीलंडेने 3-0 असा पराभव केला. तर येत्या 21 फेब्रुवारीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या सामान्यांसाठी आज पासून भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन दिवसांचा सराव सामन्याला सुरूवात झाली आहे.
या सराव सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्या भारतीय संघाची पोलखोल झाली आहे. भारतीय संघातील सुरूवातीच्या फळीतील आठ फलंदाज अपयशी ठरले आहे. पुथ्वी शॉ आणि शुभमन गिल शून्यवर तर मयांक अग्रवाल एक धाव करून आऊट झाले.
India all out for 263 in the practice game against New Zealand XI.
Vihari 101 retd, Pujara 93 pic.twitter.com/8h0uONqFpx
— BCCI (@BCCI) February 14, 2020
तसेच कसोटीचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने 18 धावा तर न्यूझीलंड दौऱ्यात दोन्ही मालिकेत स्थान न मिळालेला पण कसोटी सामन्यात संधी दिलेला युवा खेळाडू ऋषभ पंत देखील 7 धावा करून पव्हेलियनमध्ये माघारी परतला.
यात दिलासादायक बाब म्हणजे चेतेश्वर पुजारी आणि हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावला. विहारीने सर्वाधिक 101 धाव केल्या तर पुजारीने 93 धावा केल्या. भारतीय संघ 78.5 ओव्हारचा सामना खेळून 263 धावा करून बाद झाला. हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरल्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.