चित्रपटसृष्टीत काम करण्याची आणि या झगमगत्या दुनियेत आपला पाय रोवण्याची इच्छा प्रत्येकांना असते. काही जणाना ती संधी मिळते तर काहींना मिळत नाही. पण बॉलिवूड मधील दबंग, भाईजान, लवगुरू म्हणूून लोकप्रिय असलेला अभिनेता सलमान खानने अनेक नवख्या अभिनेत्र्याना पहिल्यांदा आपल्या चित्रपटात काम देऊन त्यांच्या अभिनयातील करियरला सुरूवात करून दिली आहे. अशाच काही अभिनेत्र्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
कॅटरीना कैफ (मैंने प्यार क्युं किया)
कॅटरिनाला 2005 साली आलेल्या मैनै प्यार क्यु किया या सिनेमातून ओळख मिळाली. या सिनेमात ती सलमान खानसोबत दिसली होती.
जरीन खान (वीर-2010)
जरीननं 2010 साली आलेल्या वीर या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. सलमानने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि लिड रोल दिला होता.
सोनाक्षी सिन्हा (दबंग-2010)
सोनाक्षीने सलमान खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमा दबंगमधून डेब्यू केला होता.
अथिया शेट्टी (हिरो)
प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीनं 2015 साली सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा सिनेमा हिरोमधून डेब्यू केला होता.
डेजी शाह (जय हो)
अभिनेत्री डेजी शाहला 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये ‘जय हो’ सिनेमात तिला लिड रोल देत सलमान खाननं लाँच केलं.
स्नेहा उल्लाल (लकी नो टाईम फॉर लव-2005)
ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2005 मध्ये समलान खाननं ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या स्नेहा उल्लाल हिला लकी नो टाईम फॉर लव या सिनेमातून डेब्यू केला.
हेजल कीच (बॉडीगार्ड 2011)
हेजल कीचलाही सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. 2011 साली आलेल्या बॉडीगार्ड सिनेमातून तिनं डेब्यू केला आहे.
भूमिका चावला (तेरे नाम 2003)
भूमिका चावलाचा तेरे नाम हा पहिला हिंदी सिनेमा होता. या सिनेमात ती सलमान खान सोबत काम करताना दिसली.
वरीना हुसैन (लवयात्री 2018)
लवयात्री सिनेमातून वरीना हुसैननं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती समलान खानचा जीजू आयुष शर्मासोबत दिसली होती. वरीनाला सलमाननेच लाँच केले आहे.
रवीना टंडन (पत्थर के फूल 1991)
रवीना टंडन बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमानने पत्थर के फूल या सिनेमातून तिला डेब्यू केला होता.
नगमा ( बागी:अ रिबेल फॉर लव)
90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक नगमानं 1990 साली आलेल्या सलमान खानच्या ‘बागी अ रिबेल फॉर लव’ या सिनेमातून डेब्यू केला होता.
भाग्यश्री (मैने प्यार किया 1989)
अभिनेत्री भाग्यश्री हिनं 1989 साली आलेल्या मैने प्यार किया या सिनेमातून डेब्यू केला होता.