तंत्रज्ञानात प्रगती होत असल्याने नवनवीन फीचर्सचे स्मार्टफोन्स बाजारात येत आहेत. त्यामुळे स्पर्धा ही मोठ्या प्रमाण वाढलेली दिसते. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या युक्त्या लावत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स, डिस्काउंट, सेलच आयोजन तर कधी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीतही कपात करता. तर आता स्पर्धेत टिकण्यासाठी आणि आपल्या स्मार्टफोनची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी स्मार्टफोन जगतातील लोकप्रिय कंपनी सॅमसंगने आपल्या ‘गॅलेक्सी S10’ च्या सीरिजमधील काही स्मार्टफोनच्या किंमतीत जबरदस्त कपात केली आहे. तर जाणून घेऊयात कपात केल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमती.
Samsung Galaxy S10
- या स्मार्टफोनची लाँच दरम्यान 71 हजार किंमत होती. पण त्या किंमतीत कंपनीने 16 हजार 100 रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे कपातीनंतर या स्मार्टफोनची किंमत 54 हजार 100 रूपये झाली आहे.
- हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. 6 इंचाचा क्वॉड एचडी डिस्प्ले, 12+16+12 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा कॅमेरा.
Samsamg Galaxy S10+
- हा स्मार्टफोन लाँच करते वेळी त्याची किंमत 79 हजार रूपये होती, तर आता यात 17 हजार 100 रूपयांची कपात होऊन ती किंमत 61 हजार 900 रूपयांवर पोहचली आहे.
- सदर स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. 6.3 इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले, 12+16 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 10+8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 4100 एमएएच क्षमतेची बॅटरी.
Samsung Galaxy S10e
- लाँचिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 55 हजार 99 रूपये होती. त्यात कंपनीने 8 हजार रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना 47 हजार 900 रूपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकतो.
- हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. 5.8 इंचाचा फुल डिस्प्ले, 12+16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा कॅमेरा.