गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून 12 मार्च 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) पदासाठी 15 जागा तर एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) पदासाठी 10 जागा ठरविल्या असून एकूण 25 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) 65% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नॉलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020
- पद क्र.2: (i) 65% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020
वयोमर्यादा आणि शुल्क
सदर भरती 28 वर्षांपर्यंतच्या उमेदवाऱ्यांसाठी असून SC/ST साठी 5 वर्षांची आणि OBC साठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा