रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा.संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.
तेंव्हा पासून संपुर्ण जगभरात आजचा 14 फेब्रुवारीचा दिवस ‘व्हॅलनटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. सध्या आपल्या देशात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. देशातील अनेक पीडीत मुलीन्यायाच्या प्रतिक्षेत आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी लांबणीवर पडत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या हिंगणघाट येथील शिक्षिकेवर पेट्रोल टाकुन तिला जाळण्यात आल्याच्या घटनेने राज्यातील वातावरण ढवळुन निघाले आहे. तेंव्हा आजच्या व्हॅलनटाईन या प्रेम साजरे करण्याच्या दिनी समाजातल्या प्रत्येक ती च्या सन्मानाची, सुरक्षेची जबाबदारी घेण्याच वचन आपल्या प्रेयसीला द्या. हिंदु असो, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन किंवा मग इतर कोणताही धर्म असो लग्न करताना आपल्या जोडीदाराची आयुष्यभर साथ देण्याच वचन प्रत्येकजण देत असतो. तेंव्हा आणि आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने संस्मरणीय करा.
आयुष्यात आपल्या सुख दुखाचा वाटेकरी कोणीतरी असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. प्रेम म्हणजे निस्वार्थी भावना, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे स्वता इतकेच किंबहुना त्याहुन आधिक महत्व आपल्या प्रिय व्यक्तीला देणे. नव्याने प्रेमात पडलेले, अनेक वर्षांपासून एकमेकांचे साथी असलेले अनेकजण आजच्या दिवसाच खास प्लानिंग करत असत. यात तरुणाई विशेषताहा आघाडीवर असते. तेंव्हा या गोष्टींनी तुमचा व्हॅलनटाईन तुम्ही खास करु शकता.
लग्न
लग्न करण्यासाठी अनेक प्रेमी युगल आजच्या दिवसाची म्हणजेच व्हॅलनटाईनची तारीख निवडतात. तेंव्हा तुम्ही तुमच्या प्रेयसीला एक सुंदर रिंग भेट देऊन आजच्या दिवशी लग्नासाठी प्रपोज करु शकता. अर्थात आज लगेचच ते शक्य नसल्याने पुढच्या व्हॅलनटाईनला याच दिवशी तुम्ही लग्नाच्या बंधनात अडकु शकता.
फिल्मी सेलिब्रेशन
शक्यतो प्रत्येक प्रियकराला किंवा प्रेयसीला आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्ती काहीना काहीतरी भेट देणार हे माहिती असत. त्यामुळे या दिवशी काय सरप्राईज देऊन आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करावे हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तेंव्हा आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या कॅफेत, किंवा हॉटेलमध्ये स्पेशल सिट आधीच बुक करुन, एक मस्त हार्ट शेफचा केक. कॅन्डलाईट लंच किंवा डीनर करुन तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला फिल्मी पद्धतीने सरप्राईज करु शकता.
लव लेटर
बऱ्याच जणांना खुप काही बोलायच असत. मात्र त्यांना ते शब्दात मांडता येत नाही, किंवा सांगता येत नाही. तेंव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एक सुंदर लव लेटर लिहु शकता. ज्यात तुमच्या प्रेमाची सुरवात झाली तिथुन आता पर्यंतच्या सगळ्या सुंदर आठवणी तुम्ही त्यात लिहु शकता. त्याच बरोबर जर शक्य झाल्यास त्या सुंदर आठवणींचे सुंदर फोटो देखील तुम्ही काढुन त्या पत्रात लाऊ शकता. इतर कोणत्याही गिफ्ट पेक्षा हे गिफ्ट तुमच्या प्रेयसीला नक्कीच खुप आवडेल.
या व्यतीरिक्त चॉकलेट, टीशर्ट, वॉच किंवा प्रिंटेड मोबाईल कवर, कॉफी मग यांसारखे गिफ्ट देखील तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तील देऊन त्याला खुश करु शकता.