Ads
हेल्थ वेल्थ

‘ऍसिडिवर’ हे घरगुती उपाय

Home Remedies on Acidity
डेस्क desk team

आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा सतत चुकतात. कामासाठी तासंतास बाहेर राहावे लागत असल्याने अनेकदा बाहेरचे अन्नपदार्थ, फास्टफुड अनेकजण खात असतात. तसेच अपूर्ण झोप, बिघडलेल्या दिनक्रमाचा सगळ्यात जास्त पोटावर परिणाम होत असतो. यातूनच मग ऍसिडिडी, गॅसेस होण यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात. ऑफीसमध्ये, प्रवासात, बऱ्याचदा चारचौघात बसल्यावर गॅसेस झाल्यावर आपली काय परिस्तीती होत असते, हे सांगायची गरज नाही. तेंव्हा आज आम्ही तुम्हाला गॅसेसवर काही घरगुती टीप्स सांगणार आहोत. हे उपाय अगदी सोपे आणि सहज करता येतील असेच आहेत.

ओवा

प्रत्येकाच्या घरात ओवा हा असतोच. तुम्हाला जर पोटात मुरडा अल्य़ासारखे वाटत असेल तर हातावर ओवा थोडा चोळून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. ओवा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या सोबत सहज कुठेही जाताना बाळगु शकता.

गुळ खा

जेवणाच्या बदललेल्या वेळा यामुळे अन्नपचन होत नाही. पुर्वी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे. मात्र आता लोकांकडे वेळच नसल्याने घरी गेल्यावर जेवुन कधी झोपतो अस, झालेल असत. तेंव्हा दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल.

आल्याचा तुकडा

बऱ्याचवेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चाहा लिंबु पिळुन पीला जातो. त्यामुळे निश्चित फरक पडतो, मात्र जर चहात लिंबा सोबत अद्रक देखील टाकल्यास त्याचा अधिक लाभ होतो. त्याच बरोबर तुम्ही नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले आणि तुम्ही त्याचा रस पिलात आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. यातून बद्धीतकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो.

बडीशेपचे पाणी

जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. खरतर ही एक चांगली सवय आहे, बडीशेप किंवा पान खाल्याने अन्नाचे चांगले पचन होते. 1 कप उकळलेल्या पाण्यात 1 चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात 3 वेळा प्यायल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.

वारंवार छातीत जळजळ होणे, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी हे नेहमी होणारे त्रास आहेत. त्यामुळे त्यासाठी वारंवार गोळ्या औषध घेणे योग्य नाही. तेंव्हा जर का तुम्हाला पोटात अचानक दुखायला लागत असेल. पोट साफ होत नसेल, अपचन ,ऍसिडिटी होत असेल तर तुम्हाला गॅसचा त्रास आहे हे समजून घ्या. वरील उपायकरुन तुम्ही या प्रॉब्लेमला दुर घालवु शकता.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: