प्रत्येक नागरिकांमध्ये निर्सग प्रेम हे ठासूस भरलेल दिसत. त्यामुळे निर्सगामधील चक्क करणाऱ्या गोष्टी पाहण्यास अधिक उत्साही असल्याचे पाहायला मिळते. असाच एक चक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील विश्वास बसणार नाही अशी गोष्ट म्हणजे, सर्वसाधारणपणे आपण पाहतो आणि ऐकतोही की साप बेडकाला खातो मात्र या व्हिडिओत बेडूक सापाला खाताना दिसत आहेत.
व्हिडिओत काय?
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केवळ 37 सेकंदात हिरव्या रंगाच्या बेडकांनी सापला खाल्याचे दिसत आहे. साप बेडकाच्या तावडीतून सुटण्याचा अखेर पर्यंत प्रयत्न करत आहे. पण बेडकांनी काही सेकंदात या सापला जिवंत गिळले असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी त्यातील दृष्य पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सध्या व्हायरल होणार हा व्हिडिओ 2018 मध्ये एका युट्यूब चॅनलवर अपलोड केली होती. त्यावेळी ही या व्हिडिओला नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रीया दिल्या होत्या. तर आताही या व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.