Ads
ओपन मांईड

‘हा’ देश मौल्यवान हत्तींना मारत आहे!

डेस्क desk team

बोत्सवाना नावाच्या देशाने चक्क हत्तींना ठार मारण्यासाठी परवाना देणे सुरू केले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचेग्रामीण भागात स्वागत तर वन्यजीव संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण? सविस्तर पाहुयात….

‘या’ सेलिब्रेटींनी 2014 मध्ये जगातील सर्वाधिक हत्ती असलेल्या या देशात हत्तींच्या शिकारवर बंदी घातली होती. परंतु, ताज्या निर्णयानंतर आता शिकारी कायदेशीररित्या हत्तींची शिकार करू शकणार आहेत. नुकतेच त्यांनी यासंदर्भात 7 परवाने विकले केले आहे. प्रत्येक शिकारीला जास्तीत-जास्त 10 हत्ती मारण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमानुसार, अशी शिकार नियंत्रितभागात केली जाऊ शकते. बोत्सवानामध्ये हत्तींची संख्या 1 लाख 30 हजारांहून अधिक आहे. जगातील इतर कोणत्याही देशात इतके हत्ती सापडत नाही.

कसा झाला परवाना लिलाव? : राजधानी गॅबरोनमध्ये 10-10 हत्तींच्या 7 पॅकेजचा लिलाव करण्यात आला. केवळ
बोत्सवानामध्ये नोंदणीकृत कंपन्यांनाच या परवान्यासाठी बोली लावण्याची परवानगी होती. प्रत्येक बोलीदात्यास 18 हजार डॉलर्सची परतावा रक्कम जमा करायची होती.2020 मध्ये 272 हत्तींना ठार मारण्यासाठी सरकारने कोटा ठरविला आहे. शिकारी त्याच भागात असतील जेथे हत्तींचा माणसांशी जास्त संघर्ष आहे. वन्यजीव विभागाचे प्रवक्ते एलिस ममोलावा म्हणाले की, यामुळे वस्त्यांमधील हत्तींचा दहशत कमी होईल.

कोट्यवधींचा फायदा : येथील सरकारने सध्या 272 हत्तींना ठार मारण्यासाठी 7 परवाने दिले आहेत. परवान्यामध्ये असे लिहिलेले आहे की, प्रत्येक हत्तीची किंमत 31 लाख रुपये आहे. म्हणजेच हत्तींना ठार मारण्याऐवजी तुम्हाला इतके पैसे जमा करावे लागतील. हत्तींना ठार मारल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फायदा सरकारला होईल.

बंदी का उठवली? : ग्रामीण भागातील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, हत्तीच्या व्यावसायिक शिकारची परवानगी मिळाल्यानंतर हत्ती त्यांच्या खेड्यात व घरात येणे कमी होईल. तसेच ज्या ठिकाणी पर्यटक येत नाहीत अशाना चांगले उत्पन्न मिळेल. तथापि, पर्यटनाशी संबंधित काही लोकांचा असा विश्वास आहे की, या नंतर शिकारविरोधी पर्यटक या भागात येणे पसंत करणार नाही.

हत्तीचे सर्वात मोठे घर : बोत्सवानाच्या पर्यावरणासाठी हत्तींना फार महत्त्वाचे मानले जाते. हे जगातील हत्तींचे सर्वात मोठे घर आहे. 2014 मध्ये हत्तींच्या संख्येत घट झाल्याचे पाहिल्यानंतर त्याच्या शिकारवर बंदी घालण्यात आली होती. मागील मोजणीनुसार बोत्सवानामध्ये 1,30,457 हत्ती आहेत. एका अहवालानुसार, गेल्या 10 वर्षात आफ्रिकन हत्तीपैकी 30% हत्ती कमी झाले आहेत. हस्तिदंताच्या शोधासाठी शिकारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. टांझानिया, मोझांबिक, अंगोला आणि कॅमरून येथे हत्तींच्या शिकारीचे प्रकरणे वाढल्यास जवळच्या देशांतील हत्तींनी बोत्सवानामध्ये आश्रय घेतला होता.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: