Ads
जरा हटके

‘हे’ एवढ्या वर्षांपासून देतात मोफत जेवण!

डेस्क desk team

इटलीची राजधानी रोममधील एक 92 वर्षीय डिनो इम्पेग्लियाजो हे गत 15 वर्षांपासून ते आठवड्यातील 3 दिवस 1 हजार गरीब व बेघरांना जेवण देतात.

टीमची मदत : एक खास किचन तयार केले असून हे जेवण आठवड्यातून 3 रेल्वे स्टेशन्स व 1 दिवस प्रसिद्ध सैंट पीटर्स स्केअर येथे वाटतात. या कामात एक टीम त्यांना मदत करते.

डिनो इम्पेग्लियाजो यांच्याबद्दल : ते सोशल सिक्युरिटी विभागात कार्यरत होते. यासाठी त्यांनी एक असोसिएशन सुरु केली असून त्यात 300 लोक काम करतात. ते आठवड्यातून 4 दिवस फूड मार्केट व बेकरीमध्ये दान मागतात. मिळालेल्या रकमेतून त्यांचे जेवण बनवून लोकांमध्ये वाटतात.

डिनो सांगतात : याची सुरुवात 15 वर्षांपुर्वी रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या गरजूपासून केली. याद्वारे लोकांना जोडण्याचे काम करतो, जेणेकरून रोममधील लोकांमध्ये प्रेम व आपलेपणा कायम राहिल.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: