राजस्थानच्या आबू रोड येथील ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये जगातील पहिला असा सोलर प्लांट तयार करण्यात आला आहे, जो 24 तास सुरू असतो. यामध्ये थर्मल स्टोरेजची देखील सुविधा आहे, ज्यात सुर्याची उष्णता जमा केली जाते.
इंडिया वन : या प्लांटमध्येच पहिल्यांदा पॅराबोलिक रिफ्लेक्टर विथ फोक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे पॅराबोलिक रिफ्लेक्टर सुर्याच्या दिशेसोबत फिरते. याला इंडिया वन असे नाव देण्यात आलेले आहे.
विशेष : या प्लांटद्वारेच दररोज 35 हजार जणांचे जेवण बनते. सोबतच 20 हजार लोकांच्या टाउनशिपला वीज मिळते.
प्लांटचे कामकाज :
- 25 एकरमध्ये पसरलेल्या या प्लांटमध्ये 770 पॅराबोलिक रिफ्लेक्टर आहे. 1 रिफ्लेक्टर 600 वर्गफूटाचे असते. सुर्याची किरणे रिफ्लेक्टरला लागलेल्या काचेला स्पर्श करतात.
- रिफ्लेक्टरजवळील फिक्स फोक्स बॉक्स या किरणांना जमा करते. याच्या आतील कॉइलमध्ये पाण्याद्वारे वाफ तयार होते व याचद्वारे जेवण बनते. वाफ टर्बाइनद्वारे वीज बनते.