संपुर्ण देशाच लक्ष लागुन राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साप झाला असच म्हणाव लागेल. विधानसभेच्या 70 जागांपैकी तब्बल 63 जागांवर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजपला 7 जागा मिळाल्या असून काँग्रेससाठी हा सगळ्यात मोठा पराभव मानावा लागेल. दिल्ली विधानसभेत काँग्रेसला एकाही जागी खात उघडता आलेले नाही. देशातील एक विधानसभा काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचं स्वप्न पुर्ण झाल असल, तरी भाजपचा झालेला पराभव हा देखील त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मानावी लागेल.
केजरीवाल यांची प्रतिक्रिया
दरम्यान, विजया नंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिल्ली करांनी मुलावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बदलत राजकारण हे देशासाठी चांगला संदेश असून, लोकांनी विकासाला आणि कामाला मतदान केल्याच देखील केजरीवाल यावेळी म्हणाले.
देशभरातील प्रतिक्रिया
‘राष्ट्रवादा विरुद्ध विकास जिंकला’ अशा प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिल्या. भाजपच्या दिल्लीतील कार्यालयासह, महाराष्ट्र, पंजबामध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच जोरदार सेलिब्रेशन करायला सुरूवात केली होती.. अरविंद केजरिवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमन होणार आहे. दिल्लीतील पराभावाची जबाबदारी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी स्वीकरली आहे. भाजपच्या अहंकाराचा पराभव झाल्याच्या प्रतिक्रिया ही अनेकांनी दिल्या आहेत. दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे.
आपचे उपमुख्यमंत्री पराभवाच्या छायेत
दरम्यान, आम आदमी पक्षाला दिल्लीत एक हाती सत्ता मिळत असली, तरी आपचे महत्वाचे नेत, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया हे मतमोजणी दरम्यान, पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान, लोकसभेला सगळ्या 6 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या विधानसभेतील पराभवावर बोलताना अनेकांनी केंद्रात मोदी मात्र राज्यात भाजपला नाकरण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या देशात सीएए आणि एनआरसी विरोधात अनेक निदर्शने सुरु असून, दिल्लीच्या निकालावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देताना ‘दिल्लीत भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असे म्हटले आहे’.