Ads
बातमीदार स्पेशल

शेतकऱ्याने चक्क बैलासाठी बांधली समाधी!

शेतकरी आणि बैलाचा नात कसे असते याबाबत आपण सर्वश्रुत असालच. मात्र या बातमीत काही वेगळचा नात पाहायला मिळाल. लहानापासून मोठे केलेल्या बैलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने शेतकऱ्याने मरणोत्तर त्याचा अगदी मयत व्यक्तीसारखा दशक्रिया विधी करत समाधी उभारून मुंडन करून विधीवत पूजा केली. त्यांनी एका मुक्या प्राण्याबद्दलच  व्यक्त केलेले प्रेम पाहून सारेच भारावले आहेत.

सहा महिन्यांचा होता तेंव्हा पासून पोसले

पुणे जिल्ह्याच्या मावळ परिसरात धामणे येथे राहणारे वाघोजी गराडे यांनी चाकण च्या बाजारातून अवघ्या सहा महिन्यांचा कबीऱ्या (बैल) आणला होता. आपल्याला घराच्या अंगणात असलेल्या कुत्र्या, मांजऱ्यांचाही आपल्याला लळा लागतो. तसाच गराडे कुटुंबियांनाही कबीऱ्याचा लळा लागला. अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ आणि घरातील प्रत्येकाने त्याच्यावर प्रेम केले. पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातील लोकांसाठी बैलगाडा शर्यत ही जीव की प्राण आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर सरकारने बंदी घातली आहे. मात्र अशाही परिस्थितीत वाघोजी गराडें प्रमाणे अनेक जण बैलांचा सांभाळ करत आहेत.

जिंकलेल्या शर्यती

आजुबाजुच्या संपुर्ण पंचक्रोशीत तिथला राजा म्हणून ओळख असलेल्या कबीऱ्या प्रत्येक शर्यतीत पहिला यायचा. मालक वाघोजी गराडे यांना कबीऱ्याने अनेक शर्यती जिंकून दिल्या. चार तालुक्यात मालकाचे नावलौकिक केले होते. मावळ केसरी, मुळशी केसरी, हिंदकेसरी अश्या अनेक ठिकाणच्या बैलगाडा शर्यती त्याने जिंकुन दिल्या. मात्र 18 वर्षाच्या कबीऱ्या 1 फेब्रुवारीला आपल्या मालकाला सोडून गेला.

असा झाला मृत्यू

सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद असल्याने तो गोठ्यात बसून होता. त्यामुळे त्याचा स्थूलपणा वाढला होता आणि त्यातच ह्रदय विकाराने त्याचा मृत्यू झाला. जेव्हा, मालक हे त्याला पाहण्यासाठी नेहमी प्रमाणे सकाळी गेले तेव्हा तो मृत्यू पावला होता अस दिसलं. त्याच्या मृत्यू नंतर माणसांप्रमाणे त्याच्यावर दशक्रियाविधी करण्यात आले, यावेळी दशक्रिया विधीला अनेक बैल गाडा मालक उपस्थित होते. यावेळी बैलगाडा शर्यतीचा विषय पुन्हा एकदा चर्चीला गेला. यावेळी सर्व गाडा मालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडून शर्यत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आपल्या पोटच्या मुला प्रमाणे वाढवलेल्या कबीऱ्याला अखेरचा निरोप देताना गराडे कुटूंबियांना अश्रु आनवर झाले होते. बैल आणि शेतकऱ्याच्या अनोख्या प्रेमाच दर्शन या घटनेतुन लोकांना घडल.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: