इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्या.
पद आणि जागा
सिव्हिल या पदासाठी पदवीधर अप्रेंटिससाठी 32 जागा आणि टेक्निशिअन अप्रेंटिससाठी 25 जागा, इलेक्ट्रिकल पदासाठी पदवीधर अप्रेंटिससाठी 7 जागा आणि टेक्निशिअन अप्रेंटिससाठी 9 जागा, तर एस अँड टी पदासाठी पदवीधपर अप्रेंसिटसाठी 2 तर टेक्निशिअन अप्रेंटिससाठी 1 जागा ठरविण्यात आल्या आहेत. तर पदवीधरसाठी 41 आणि टेक्निशिअनसाठी 35 अशा एकूण 76 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
- टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा आणि शुल्क
सदर भरतीसाठी उमेदवाराचे कमाल 18 ते किमान 30 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
Manager/ HRM, IRCON INTERNATIONAL LIMITED, C-4, District Centre, Saket, New Delhi – 110 017
अधिक माहितीसाठी- पाहा