लोकप्रिय ‘Realme’ कंपनीचा फ्लिपकार्टवर आजपासून ‘Realme Days Sale’ सुरू झाला आहे. हा चार दिवस चालणार सेल असून 13 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये रियलमीच्या स्मार्टफोन जबरदस्त डिस्काउंट देण्यात आलेय. तसेच या सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. तर हि ऑफर EMI वरही उपलब्ध असणार आहे.
Presenting the Quad Camera leap to exciting offers!
-Flat ₹500 Off on #realme5
-Flat ₹1,000 Off on #realme5Pro
-10% Instant Discount on ICICI Bank Credit Cards#realmeDays sale is live till 13th Feb on https://t.co/HrgDJTZcxv & @Flipkart.
Know more: https://t.co/oYr682bcmM pic.twitter.com/0ulPsEjtwL— realme (@realmemobiles) February 10, 2020
रियलमी X
4 जीबी रॅमचा स्मार्टफोन 14 हजार 999 रूपयांमध्ये तर 8 जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंम 17 हजार 999 रूपये आहे.
रियलमी XT
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आणि 4,000mAh ची बॅटरी क्षमता असणारा 15 हजार 999 रूपये किंमतीच्या स्मार्टफोनवर 1 हजार रूपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
रियलमी X2 प्रो
या स्मार्टफोनची मूळ किंमत 27 हजार 999 रूपये असून जुना एक्सचेंज केल्यास हा स्मार्टफोन 2 हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.
रियलमी 3 प्रो
या स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांचा डिस्काउंट दिली आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन 9 हजार 999 रूपये पर्यंत सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.
रियलमी 5 प्रो
या स्मार्टफोनवर 3 हजारांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. 4 जीबी रॅमचा स्मार्टफोन 11 हजार 999 रूपये तर 8 जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रूपये झाली आहे.
रियलमी C2
या स्मार्टफोनवर 2 हजारांचा डिस्काउंट दिला आहे, त्यामुळे 2 जीबी रॅमचा फोन 5 हजार 999 रूपये तर 3 जीबी रॅमचा स्मार्टफोन 6 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.