व्हॅलेनटाईन विक मधला सगळ्यात स्पेशल आणि छान दिवस असे आपण ‘हग डे’ ला म्हणूच शकतो. प्रेम व्यक्त करण्याची सुंदर आणि अबोल भावना म्हणजेच आपल्या प्रिय व्यक्तीला हग करणे. प्रेमाच्या वेगवेगळ्या भावना या हग म्हणजेच आपल्या प्रिय व्यक्तीला गळा भेट देणे, अलिंगण देणे होय. प्रत्येक वेळी हग करताना व्यक्त होण्याच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या भावना असतात जाणून घेऊयात.
प्रियकराने प्रेयसीला केलेली
प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन व्यक्तींना एकमेकांचा विरह असह्य होत असतो. अशा वेळी खुप वेळा नंतर आपल्या प्रिय व्यक्तीला भेटल्यावर त्याच्याशी काहीही बोलण्या आधी त्याला भेटुन हग करुन त्याच्या प्रती असलेल्या प्रेमाची भावना व्यक्त केली जाते.
आईने मुलाला केलेली
आई आणि मुलाच्या नात्या इतक सुंदर नात या जगातच नाही. आपला मुलगा परदेशी शिक्षणासाठी गेला, बाहेर गावी शिकत असेल तेंव्हा तो परतताना किंवा तो जाताना त्याला प्रेमाने आईने अलिंगन देणाची भावना काही वेगळीच असते.
मुलींनी बांबांना केलेली
मुलगी ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते, अस म्हंटल जात. मुलींचही आई पेक्षा वडिलांवर काहीस जास्त प्रेम असत. जगातील कुठल्याही जागेपेक्षा वडिलांच्या कुशीत मुलींना सर्वाधिक सुरक्षित असल्याची भावना असते. त्यामुळे मुलगी सासरी जातांना आपल्या मुलीला पित्याने प्रेमाने दिलेल अलिंगन म्हणजेच हग हे सुखद-दुखाच्या भावना व्यक्त करणार हग असतो. आणि हग करण्याचा तो प्रसंग मुलींना आयुष्यभर लक्षात राहणारा असतो.
दु:खाच्या प्रसंगी
प्रेमाच्या व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या भावनांबरोबरच वेगवेगळ्या क्षणांनाही तितकच महत्व आहे. दुखाच्या प्रसंगी आपल्या प्रिय व्यक्तीला आधार स्वरुपात केलेल हग किंवा लहान मुल घाबरल्यावर त्यांनी वडिल किंवा आईला केलेल हग. मित्राने- मित्राला केलेल हग. तेंव्हा आजच्या हग डे च्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीला हग करा आणि तुम्ही नेहमी त्याच्या सोबत असल्याचा विश्वास प्रेम तुमच्या प्रिय व्यक्तीली करुन द्या.