व्हॅलेनटाईन विकचा आजचा पाचवा दिवस. हा आपल्या प्रिय व्यक्तीला म्हणजेच पार्टनरला एक छानस प्रॉमिस द्यायचा दिवस आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि,आपल्या प्रिय व्यक्तीला काय प्रॉमिस द्यावे.
कोणत्याही दोन माणसांमधल नात हे त्या दोघांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासावर टिकून असत. त्यामुळे आपल्या पार्टनरचा आपण कधीही विश्वासघात करणार नाही याच प्रॉमिस त्यांनी स्व:त स्वतला आधी दिल पाहिजे. प्रेम आणि त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे लग्न, किंवा अनेकांच लग्ना नंतर प्रेमाच्या प्रवासाला सुरवात होते. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आपल्या पार्टनरची साथ न सोडण्याच वचन प्रत्येकजण लग्न करताना देतच असतो, तेच आय़ुष्यभर पाळण्याच सगळ्यात मोठ प्रॉमिस तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊ शकता.
आयुष्यातील प्रत्येक टप्पा सारखा नसतो, कधी श्रीमंती तर कधी गरीबी उतार चढाव येतच असतात. तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत पार्टनरची साथ न सोडण्याच प्रॉमिस तुम्ही करु शकता. अस म्हंटल जात आपला जोडीदार सोबत असेल तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा माणूस सामना करु शकतो.
तुमच्या पार्टनरला आवडत नसलेली एखादी गोष्ट, व्यसन, स्वभावातील बदल अशा काही गोष्टींच प्रॉपिस तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या पार्टनरला करु शकता. तुमच्या पार्टनरचा हात हातात घेऊन तुम्ही त्याला हे प्रॉमिस करु शकता. आजकाल लग्ना नंतर लगेचच डिवॉर्स होण्याच प्रमाण वाढत चालले आहे. तेंव्हा नात्यात काही गोष्ट समजून घेणे, काही गोष्टी सोडुन देणे, समजुतदारपणा दाखवणे, जबाबदारी घेणे असे काही वेगळे प्रॉमिसेस देऊनही तुम्हाला तुमच नात आणखी घट्ट करता येईल.