वसई-विरार महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन पुकारले होते. यावेळी महापालिकेवर गंभीर आरोप करत बांधकाम विभागाकडून सुरू असलेला भ्रष्ट्राचार थांबलाच पाहिजे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांनी सांगितले. यासंबधित प्रकरणाची चौकशी होण्यासाठी निवेदनही त्यांनी पालिकेकडे सुपूर्द केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी हितेश जाधव म्हणाले की, वसई-विरार शहरात कित्येक वर्षापासून बांधकाम विभागाचा भ्रष्ट्राचार सुरु आहे. रस्ते, गटार याबबत निविदा निघण्याआधीच पैसे निघतात. तसेच कामामध्येहि मोठी तफावत जाणवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच जो व्यक्ती टेंडर काढतो त्या व्यक्तीला सोडून चौथ्या व्यक्तीला टेंडर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात कुठलेही होत असेल तर निविदा निघाल्यावर ज्या ठिकाणी काम केले जाते तेथे फलक लावणे बंधनकारक असते. मात्र अनेक प्रकरणात बांधकाम विभागाकडून फलक लावलेच जात नाही. यामागे मोठा भ्रष्टाचार आहे. तसेच सत्ताधारी व पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे हितेश जाधव यांनी सांगितले.