गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, अॅमेझॉन अशा नावजलेल्या कंपन्यांमध्ये काम करण्याचे अनेक जण स्वप्न रंगवत असतात. या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, वागणून, पगार ऐकून किंवा वाचून प्रत्येकांनाच इथे काम करण्याचे आकर्षण असते. पण अशाही काही गोष्टी असतात त्यासाठी कंपनींमध्ये कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्यात येते. या गोष्टी साधारणत: समोर येत नाहीत पण आज आम्ही तुम्हाला काही लोकप्रिय कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यावर घातलेल्या अजब बंधनांबद्दल सांगणार आहोत.
गुगल
भारताचे लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ‘गुगल’ कडे पाहिले जाते. या सर्च इंजिंनने 2019 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम बनवले होते. ज्यात, आपली ज्या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे तेच काम करण्यास कर्मचाऱ्यांनी पहिले प्रधान्य दिले पाहिजे, कामाशिवाय राजकीय घडामोडी असो व इतर कुठल्याही विषयी चर्चा करायची नाही असा फर्मान काढला होता.
मायक्रोसॉफ्ट
या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना ग्रामर्ली या अॅप्लिकेशनचा वापर करण्यास बंद आहे. हे अॅप लिहिलेल्या मजकूरातील व्याकरण तपासून पाहत. याचबरोबर कंपनीत गुगल डॉक्यूमेंट वापरण्यावर प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष रित्या बंदी असून कर्माचाऱ्यांनी वापल्यास त्यांना त्यासंबंधी स्पष्टीकरण द्यावे लागते.
उबर
उबर या लोकप्रिय टॅक्सी बुकिंग कंपनीतील कर्माचाऱ्यानांही अनेक नियम कंपनीकडून लागू करण्यात आले आहेत. त्यात कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षांनी कामाच्या ठिकाणी कोणत्या कर्मचाऱ्यांनी टेलिग्रामसारख्या अॅप्लिकेशनचा वापर करू नयेत असा नियम तयार केला आहे.
आयबीए
या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना रिमुव्हेबल डिव्हाइस म्हणजेच पेन ड्राइव्ह, मायक्रोएसडी कार्ड यासारख्या गोष्टी वापरण्यावर बंदी असल्याचे 2018 साली कंपनीने स्पष्ट केले होते.
अॅमेझॉन
जगातील आघाडीच्या इ-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अॅमेझॉनमध्ये कॉर्पोरेट जगतामध्ये वापरल्या जाणाऱ्या एका गोष्टीवर बंदी आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा केला होता. अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना ‘पॉवर पॉइण्ट प्रेझेंटशन’ म्हणजेच ‘पीपीटी’ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मागील कारण जेफ यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
फेसबुक
फेसबुक कंपनीमध्ये काम करायचे असेल तर आयफोन वापरता येणार नाही. फेसबुकमध्ये आयफोनवर बंदी आहे. काहीजणांच्या मते फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग आणि अॅपलचे कार्यकारी अध्यक्ष टीम कूक यांच्यातील वादामुळे हा अलिखित नियम बनवण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात कंपनीने, “आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अॅण्ड्रॉइड वापरण्यासाठी प्रोत्साहन देतो. अॅण्ड्रॉइड ही जगातील सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीम असल्याने आम्ही असं असतो,” असं सांगत आपली बाजू मांडली होती.