Ads
बातम्या

हिंगणघाट जळीतकांड; राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

डेस्क desk team

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. या घटनेत ती 40 टक्के भाजली होती. दरम्यान गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृयुशी झुंज देत होते. मात्र आज अखेर पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय नेत्यांपासून कलाविश्वात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

3 फेब्रुवारी रोजी एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे या तरुणाने प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी सुरु असणारी झुंज आज सकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात या तरुणीने अखेरचा श्वास घेतला. पीडितेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दुपारनंतर पीडितेच्या मूळ गावी म्हणजेच दारोडा येथे अत्यंविधी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुलीच्या या मृत्युनंतर बापाच्या हि अश्रूंचा बांध फुटला. माझ्या मुलीला त्वरीत न्याय द्या. निर्भयासारखा न्यायाला उशीर करू नका. त्या नराधमाला आमच्यासमोर आणा. आमच्या स्वाधीन करा. त्याचं काय करायचं ते आम्ही पाहू, असा आक्रोश या पीडितेच्या वडिलांनी केला.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही असा सज्जड दम अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला ट्विटरवरून दिला आहे.

मुलीच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

हिंगणघाट येथील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीने होत आहे याचं दुःख वाटतं. भावपूर्ण श्रद्धांजली!

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: