प्रत्येक शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या शुभ आशिर्वादाने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र तुमच्या नावातच जर श्री गणेशा साकारला तर…नवल आहे…मात्र अशी अवलिया कलाकार बातमीदारने हेरली असून,तिच्या कला प्रवासाची माहिती घेतली आहे.
गणेशाला 64 कलांचा अधीपती असही म्हंटल जात. तुमच्या नावात श्री गणेशाच नाव साकारणारा कलाकार तुम्ही पाहिला आहे का? केवल दोन मिनीटात तुम्ही सांगितलेल्या कोणत्याही नावाचा गणपती अंकिता मोरे साकारते. आतापर्यंत तीने जवळपास 5 हजाराच्या आसपास अक्षर गणेश साकारले आहेत. मुळची मुंबईच्या बोरीवलीत राहणारी अंकिता अवलिया कलाकार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षर गणेश साकारण्याच्या या कलेच अंकिताने कोणतही प्रशिक्षण घेतलेल नाही. ही कला तिने स्वत:च आत्मसात केली आहे. गेल्या चार वर्षांपासून तीने ही कला जोपासली असून, अतापर्यंत तुमच्या आमच्या सारख्या अनेकांच्या नावातून तीने अक्षर गणेश साकारले आहे. सुरवातीला एक अक्षर गणेश काढण्यासाठी तीला तीन ते पाच मिनिटे लागायची. मात्र आता अवघ्या दोन ते जास्तीत जास्त तीन मिनिटात ती तुम्ही दिलेल्या नावातन अक्षर गणेश साकारते. बातमीदारशी बोलताना तिने अवघ्या दोन मिनीटात बातमीदार नावाचा अक्षर गणेश साकारला.
अक्षर गणेश व्यातिरिक्त कॅनवास पेंटींग, टीशर्ट वर पेंटींग करणे, तुमच्या मोबाईल कवरवर पेंटींग ती करते. त्याच बरोबर चित्रकलेचे क्लास देखील ती घेते.