विरार पूर्वेच्या मनवेल पाडा परिसरात मिसळ मोहोत्सवाची धूम सुरु आहे. या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळीचा समावेश आहे. तसेच या महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी वसई-विरार शहरातील खवय्यांची मोठी गर्दी जमली आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ व मॅजिक टच इव्हेंट्सतर्फे या मिसळ महोत्सवाचे 7 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे शुक्रवारी संध्याकाळी बहुजन विकास आघाडी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी मिसळ खाण्याच्या आस्वादहि घेतला.
या महोत्सवात नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, सांगली अशा महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळीचा समावेश आहे.त्याचबरोबर या महोत्सवात लहानग्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी ‘बालमहोत्सवा’चे देखील आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यत असलेल्या नागरीकाना या मोहोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी वसई-विरार शहरातील असंख्य खवय्यांची गर्दी जमली होती. यातील सर्व खवय्यांनी मिसळ चा मनसोक्त आनंद लुटला. दरम्यान जर तुम्ही अजूनही या महोत्सवाला भेट दिली नसेल तर आताचा भेट द्या आणि महाराष्ट्रातील विविध भागातील मिसळ खाण्याचा आनंद लुटा.