केंद्रीय लोकसेवा आयोगात भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या भरतीचा फायदा घ्यावा.
पद आणि जागा
दरम्यान, या भरतीत सायंटिस्ट B (Geo-Physics)साठी 2 जागा, सायंटिस्ट B (Physics) साठी 2 जागा, सायंटिस्ट B (Chemistry) साठी 1 जागा, असिस्टंट जिओफिजिसिस्ट साठी 17 जागा, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardiology) साठी 3 जागा, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardio-thoracic Surgery) साठी 4 जागा, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cancer Surgery) साठी 3 जागा, सिस्टिम एनालिस्ट साठी 5 जागा, स्पेशलिस्ट ग्रेड III (Microbiology/Bacteriology) साठी 3 जागा, स्पेशलिस्ट ग्रेड III (Nephrology) साठी 1 जागा, स्पेशलिस्ट ग्रेड III (Urology) साठी 2 जागा, इंग्रजीमध्ये व्याख्याता साठी 1 जागा आणि पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन साठी 9 जागा अशा एकूण 53 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) भू-भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: भौतिकशास्त्र किंवा भूभौतिकीशास्त्र/भूशास्त्र किंवा भूगोलशास्त्र किंवा गणितामधील पदव्युत्तर BE/AMIE (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन)
- पद क्र.5: (i) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) कॉम्पुटर ऍप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc. (Computer Science/IT) किंवा B.E/B.Tech(कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर टेक्नोलॉजी) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) MBBS (ii) MD/Ph.D/M.Sc./DPB (iii) 03/05 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) MBBS (ii) DM (Nephrology) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) MBBS (ii) M.Ch. (Urology) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.12: इंग्रजी विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.13: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवीधर पदवी.
वयोमर्यादा
- पद क्र.1,2,8,12 & 13: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.5, 6, 7 & 9 ते 11: 45 वर्षांपर्यंत
- SC/ST साठी 5 वर्षांची तर OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क
भरतीसाठी General आणि OBC उमेदवाऱ्यांना 25 रूपये शुल्क तर SC/ ST/ PH/ महिलासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा