लोकप्रिय इंस्टँट मेसेजिंग अॅप Whatsapp चा 2018 पासून प्रतिक्षेत असणार ‘व्हॉट्सअॅप पे’ लवकरच युजर्सच्या सेवेत रूजू होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचर्सला केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता भारतात युजर्सना व्हॉट्सअॅपवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे.
व्हॉट्सअॅपने 2018 मध्ये पेमेंट सेवेला बिटा टेस्टींगच्या रूपात जवळपास 1 लाख युजर्ससाठी जाहीर केला होता. पण याला कायदेशीर मंजुरी मिळाली नसल्याने ही सेवा सर्व युजर्स पर्यंत पोहचली नव्हती. पण आता एका वृत्त संस्थेनी दिलेल्या माहितीनुसार ‘व्हॉट्सअॅप पे’ला मंजूरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात 10 लाख युजर्सपर्यंत पोहोचू शकते. ही मंजूरी ‘राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने दिली.
फेसबुकच्या मालकिची व्हॉट्सअॅप अॅप कोट्यावधिहून अधिक युजर्स वापर करतात त्यामुळे ही सेवा नंबर वन होणार अशी खात्री कंपनीने वर्तविली आहे.