व्हॅलनटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजे ‘टेडी डे’. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच टेडी खुप आवडतो. मात्र कपल्ससाठी टेडी खुप खास असतो, कारण नव्याने प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात अखंड बुडालेल्यांना जगाचा वीसर पडतो, अस म्हणतात. ते आपल्याच भावविश्वात जगत असतात. टेडी डे च्या दिवशी मुलींना खास करुन टेडी दिलातर त्या खुप खुश होतात. कारण आपल्या प्रेमी जवळ नसताना त्या टेडीशी एकट्यात बोलतात. अनेकांना तर टेडी जवळ घेऊन झोपायची देखील सवय असते. मात्र बऱ्याचदा ‘टेडी डे’ च्या दिवशी काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो, तेंव्हा या आयडिया तुम्ही वापरु शकता.
हे टेडी गिफ्ट द्या
चॉकलेट किंवा ‘रोज डे’ च गुलाब या गोष्टी सहज लपवता येतात मात्र टेडी कसा देणार, आणि तो ठेवणार कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण टेडी डे आहे, तेंव्हा टेडी तर दिलाच पाहिजे अस वाटणाऱ्यांसाठी हे खास गिफ्ट ठरेल. प्रत्येक मुलगी साधारण पर्स किंवा बॅग वापरतच असते, किंवा किमान पाऊच तरी तेंव्हा मुल त्यांच्या प्रेयसीला टेडी असलेल छोटस किचन देऊ शकतात. तसेच मुलांकडे साधारण बाईक असतेच किंवा मग मुल बॅग वापरतातच तेंव्हा मुलीही मुलांना टेडी असलेल छानस किचन देऊ शकतात.
स्वता बनवलेल ग्रिटींग
आजकाल ग्रिटींग देण्याचा ट्रेंड नसला तरी जर तुम्ही टेडीच्या आकाराच ग्रिटींग बनवल आणि त्याला छान रंग दिला तर ते खुप सुंदर टेडी डे गिफ्ट बनु शकत. तुम्ही जर कवी असाल तर टेडी डे वर तुमच्या प्रेयसीसाठी छान कवीता करुन ती पाठवु शकता.
टेडी टीशर्ट
तुम्ही तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला एखाद टेडीचा फोटो असलेल टीशर्ट नक्कीच देऊ शकता, तेही एक छान गिफ्ट ठरेल. या व्यतीरिक्त तुमच्या घरातल्या लहान मुलांना किंवा तुम्हाला जर बाळ होणार असेल तर तुमच्या बायकोला तुम्ही एक छान टेडी गिफ्ट करु शकता.