Ads
लाईफस्टाईल

Valentine week : असा करा तुमचा चॉकलेट डे खास

choclate day
डेस्क desk team

7 फेब्रुवारीला सुरु होणाऱ्या प्रेमीयुगलांच्या व्हॅलनटाईन वीकचा तीसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. चॉकलेट अशी गोष्ट आहे जी हजारात एखादाच असेल ज्याला आवडत नसेल. प्रत्येक जण अगदी लहान असल्यापासून चॉकलेट खात असत. तेंव्हा आजच्या चॉकलेट डे च्या दिवशी आपल्या व्हॅलनटाईनला चॉकलेट देऊन तुमचा दिवस मेमोरेबल बनवा. कालच प्रपोजडेला ज्यांनी नव्याने आपल्या प्रेमाची सुरवात केली असेल, अशा मंडळींनी आपल्या प्रियकराच्या मित्र मैत्रीणीला विचारुन त्यांना आवडणारे चॉकलेट देऊन त्यांना सर्प्राइज करु शकता. या व्यतिरिक्त अनेक कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे तुमचा चॉकलेट डे खास होइल जाणून घ्या.

चॉकलेट कुरियर करा

जर तुम्ही कॉलेज स्टुडंट किंवा बाहेर गावी कामाला असाल आणि तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी हॉस्टेलवर किंवा बॅचलर म्हणून राहत असेल तर तुम्ही त्यांच्या नावे ऑनलाईन चॉकलेट पाठवुन त्यांना सर्प्राइज देऊन तुमचा चॉकलेट डे मेमोरेबल करु शकता. किंवा कॅटबरी सेलिब्रेशन पॅक तुम्ही तुमच्या प्रियकराला कुरियर करु शकता. ज्यांच्या घरी आपल्या रिलेशन बद्दल माहिती आहे, तेही अशा प्रकारच सरप्राईज देऊ शकतात.

राग घालवण्यासाठी

जर तुमची प्रेयसी किंवा प्रियकर तुमच्यावर रागावला असले तर राग घालवण्यासाठी चॉकलेट हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी त्यांच्या आवडत्या चॉकलेटच मोठ सेलिब्रेशन पॅक देऊन तुम्ही त्यांना खुश करु शकता. लहान मुल जर रडत असतील, किंवा तुमच्या जवळ येत नसतील तर चॉकलेट देण्याच आमीष देऊन त्यांना मनवण्याची कला तर तुम्हाला नक्कीच अवगत असेल.

स्वत: चॉकलेट बनवा

तुम्ही, खास करुन मुली आपल्या प्रियकराला खुश करण्यासाठी आणि आपला चॉकलेट डे मेमोरेबल बनवण्यासाठी स्वत:हा चॉकलेट बनवुन त्याला देऊ शकता. ज्यामुळे तुमचा दिवस आणखी रोमॅन्टीक देखील होऊ शकतो. या व्यतीरिक्त चॉकलेट डे विशेष मेसेजेस, स्टेटस ठेऊन ही तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश करु शकता.

चॉकलेट डे फक्त दोन प्रेमी युगलांनीच साजरा केला पाहिजे अशी गरज नाही. तुम्ही तुमच्या ऑफीसमध्ये सहकाऱ्यांना, लहान मुलांना, जवळच्या मित्रांना, आईला सुद्धा चॉकलेट देऊन चॉकलेट डे साजरा करु शकता.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: