Ads
बातम्या

Movie Review; गोष्ट मनावर ओढवलेल्या अदृश्य ‘मेकअप’ची

makeup movie
डेस्क desk team

अनेक दिवसांपासून सगळ्यांच्या मुखावर नाव असणारा ‘मेकअप’ हा मराठी चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट आहे. तसेच सर्वांच्याच परिचयाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिन्ही भूमिका एकांकिकेच्या रंगमंचावर साकारणारा गणेश पंडीत यांनी मध्यंतरीच्या काळात मराठी, हिंदी सिनेमांचेही लिखाण केले. तर ‘मेकअप’ हा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच गणेश पंडित यांनी दिग्दर्शनाची धूरा हाती घेतली. तसेच रिंकू आणि चिन्मय सह प्रतिक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे अशी स्टारकास्ट ‘मेकअप’ला लाभली आहे.

‘मेकअप’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, आपल्या मित्रमंडळींसाठी, कुंटुंबासाठी, सामाजासाठी तर काही वेळा स्वत:साठी वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप सगळेत करत असतात. पण हा मेकअप दरवेळी खोटाच असेल असे नाही. साध्या शब्दात म्हणायचे झाले तर मेकअप म्हणजे मुखवटा, कधी खोटा तर कधी आपल्या वागण्या बोलण्यातून स्मितपणे सगळ्यांसमोर येणारा, अशाच मनावरील अदुश्य ‘मेकअप’चा स्थर ‘मेकअप’ चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा

‘मेकअप’ ही गोष्ट पूर्वी (रिंकू राजगुरू) आणि नील (चिन्मय उदगीरकर) यांच्या भोवती फिरणारी आहे. पूर्वीच्या घरचे तिच्या लग्नाच्या मागे लागलेले असतात. पण ती प्रत्येक मुलाला नकार देत असते. पूर्वीला लग्न करायचे नसते तर तिला मनोरंजनविश्वात ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून करिअर करायचे असते. पण पूर्वीचा हा निर्णय तिच्या मोठ्या भावाला मान्य नसतो. त्यामुळे ‘मेकअप’च्या विविध युक्त्या लावून पूर्वी तिला बघायला आलेल्या मुलांना पळवून लावत असते.

त्यानंतर नकळतपणे नील तिच्या आयुष्यात येतो. नील हा अमेरिकेहून आपल्या मायदेशी परतलेला असतो. नील हा पेशाने डॉक्टर असतो. नील आणि पूर्वीची भेट आणि त्यावेळी घडणारा प्रपंच मनोरंजक आहे. त्यानंतर दोघांच्या भेटी गाठी वाढत जातात आणि नील पूर्वीच्या प्रेमात पडतो. नील आणि पूर्वीचे लग्नही ठरते. पण लग्नाच्या दिवशी पूर्वी तिचा मित्र अजय सोबत पळून लग्न करते. पण इथे चित्रपटाची गोष्ट संपत नाही तर काही वर्षांनी नील आणि पूर्वी पून्हा एकदा एकमेकांसमोर येतात. त्यानंतर काय होते? ते दोघे परत एकत्र येतात? पूर्वी पळून गेल्यानंतर नेमक काय होत? अशी अनेक प्रश्न तुम्हाला पडली असतील ना तर त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाचे यश-अपयश

चित्रपटाच्या दिग्दर्शन थोड मागे पुढ झाले असले तरी दिग्दर्शक गणेश पंडीत यांना चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात यश आले आहे. तसेच नीलची भूमिका साकारणारा चिन्मय उदगीरकर यांनी आपली व्यक्तिरेखा अचूकपणे मांडली आहे. पण रिकूकडून चांगल्या अभिनयाची अपेक्षा होती मात्र, तितके प्रभावीपणे अभिनय साकरताना ती फोल ठरली आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्यामुळे वन टाईम मनोरंजनासाठी ‘मेकअप’ योग्य पर्याय आहे. त्यामुळे नक्की पाहा ‘मेकअप’ चित्रपट.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: