रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांनी गरज असल्यासच बाहेर पडावे.
पश्चिम व हार्बर या दोन्ही मार्गावर माहीम ते गोरेगाव दरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून भायखळा ते माटुंगा डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावरही ब्लॉकचे काम चालेल. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मार्ग : पश्चिम/ हार्बर रेल्वे
स्थानक : माहीम ते गोरेगाव
वेळ : रविवार. स. ११ ते सायं. ४ वा.
परिणाम :
गोरेगाव ते चर्चगेट – रा. ९.३२ वा.
चर्चगेट ते अंधेरी -रा. १२.३१ वा.
चर्चगेट ते गोरेगाव – प. ५.५९ वा. (रविवारी)
गोरेगाव ते चर्चगेट- स. ७.०५ वा. (रविवारी)
हार्बरवरील सर्व गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते गोरेगाव लोकल फेऱ्याही रद्द केल्या आहेत.
मार्ग : हार्बर रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग
वेळ : रविवार, अप मार्ग- स. ११.१० ते दु. ३.४० वा. आणि डाऊन मार्ग- स. ११.४० ते सायं. ४.१० वा.
परिणाम : सीएसएमटी, वडाळा ते वांद्रे, गोरेगाव, वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
मार्ग : मध्य रेल्वे
स्थानक : भायखळा ते माटुंगा डाऊन जलद मार्ग
वेळ : रविवार, स.८.४० ते दु. १.१० वा.
परिणाम : सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल ब्लॉक काळात भायखळा ते माटुंगा स्थानका दरम्यान धिम्या मार्गावर धावतील. माटुंगा स्थानकानंतर पुन्हा डाऊन जलद मार्गावर लोकल पूर्ववत होतील. या दिवशी लोकल फेऱ्या आणि मेल-एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत.