सध्याच्या घाई गडबडीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत नकळत बदल होतो. तर काही वेळा जेवण केल्यावर काहींना भूक लागते, झोप येते अशा सवयी जडतात. पण या सवयी चांगल्यानसून त्यामुळे आरोग्यास धोका ही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत हे सांगणार आहोत.
>> जेवल्यानंतर काही जणांना पाणी पिण्याची सवय असते. पाणी पचनासाठी उत्तम पर्याय असला तरी जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. खासकरून थंड पाणी पिणे सोडा. पाणी पिण्याने पचनक्रिया धिम्या गतीने होऊन अस्वस्थता वाटू लागते.
>> तसेच काही लोकांना जेवण जेवल्यानंतर लगेच झोपून जातात. पण अन्न पचन होण्यास वेळ जातो. त्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.
>> काही लोकांना जेवल्यानंतर सिगरेट ओढण्याची सवय असते. सिगरेट पिण्यामुळे हृदय आणि श्वसनासंबंधीचे आजार निर्माण होतात. तसेच जेवण्यानंतर लगेच सिगरेट पिण्याने दहा पट अधिक धोकादायक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच कॅन्सरचा धोका असल्याचे म्हंटले जाते.
>> आंघोळ करताना पाण्यामुळे शरिरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यामुळे टाळावे.
>> चहापत्तीमध्ये सर्वाधिक आम्लाचे प्रमाण असते, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळा.
>> जेवणाबरोबरच तुम्ही फळे खात असाल तर या फळांचे पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळे पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवल्याच्या एक तासानंतर फळे खायचा सल्ला डॉक्टर देतात.