छोटया पडद्यावरिल पण प्रचंड लोकप्रिय आणि तितकाच वादगस्त ठरलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी. लवकरच ‘बिग बॉस मराठीचे तिसरे’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या रियालिटी शोची संकल्पना हिंदी टेलिव्हिजनाचा लोकप्रिय शो ‘हिंदी बिग बॉस’ सारखीच आहे.
बिग बॉस मराठीचा पहिले पर्व 15 एप्रिल 2018 रोजी पार पडला होता. या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजयी झाली होती. तर त्यानंतरच्या दुसऱ्यापर्वात शिव ठाकरेने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. लवकरच बिग बॉस मराठीचे तिसरे पर्वहि येत असल्याची माहिती ‘राजश्री मराठी’ने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे.
व्हिडिओत काय?
दरम्यान, शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिग बॉसचा मंच दिसत असून लवकरच नवीन पर्व सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यंदाच्या पर्वात अंतराळाची थिम असल्याचे समजत आहे. व्हिडिओ पाहिल्यास निश्चितच येत्या पर्वाची उत्सुक्ता शिगेला पोहोचली असेल. तसेच या कोणते स्पर्धक असतील? तसेच टाक्स कशा प्रकारचे असतील?, असे प्रश्न प्रेक्षकांना पडले असतीलच. मात्र, अद्याप बिग बॉसचे तिसरे पर्व कधी सुरू होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.