आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू, अमृता खानविलकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मलंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हाफ ‘गर्लफ्रेंड’, ‘आशिकी २’, ‘हमारी अधुरी कहानी’ यांसारख्या रोमँटिक चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मोहित सूरी याने मलंग चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सप्सेन्स थ्रीलर स्टोरी असलेला मलंग चित्रपट अनेक थरारक दृश्यांमुळे पुढे काय होईल याची प्रेक्षकांमध्ये प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढवतो. बॉलिवुडमध्ये या आधीही 36 चायना टाऊन यांसारखे खुनाचे रहस्य उलगडणारे थ्रीलर चित्रपट येऊन गेले आहेत. तशाच आशयाचा मलंग आहे.
अऩिल कपुर आणि कुणाल खेमु या चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत असून, वर्षाच्या अखेरचा आठवडा ख्रिसमस पार्टी सुरु असते. चित्रपटाचे कथानक हे गोव्यात घडत आहे. चित्रपटाची सुरवातच एका रहस्याने होते. आणि तिथुनच चित्रपट पाहण्यासाठीची उत्कंठा आणि अनेक प्रश्न पाहणाऱ्यांना पडतात. आदित्य रॉय कपुर स्व:तहा पोलिसांना म्हणजे अनिल कपुरला आपण लवकरच खुन करणार असल्याचे सांगतो. यानंतर कथानकाला खरी सुरवात होते. रोमान्स, सस्पेन्स गोष्टी आणि मसाला चित्रपटात भरभरुन आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच अनिल कपुरचा पोलिसाच्या भूमिकेतील अनेक डायलॉग तुम्ही पाहिले असतील. दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपुर यांचा रोमान्स, अचानक घडणाऱ्या घडामोडी आणि थरारक सिनमुळे चित्रपटात पुढे काय होईल ते पाहण्याची उत्कंठा कायम राहते. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. काही भडकाऊ सीन, थोडा रोमान्सचा ओवर डोस चित्रपटाला मुळ कथानकापासून दुर नेतो. मात्र उत्तरार्धात चित्रपटात एकामागे एक गोष्टींचा उलगडा होतो. त्यामुळे एकदा हा चित्रपट पाहायला जाण्यास हरकत नाही.