मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षात अनेक तादकीची संहिता आणि प्रभावी सादरीकरण पाहायला मिळत आहे. ज्याने सामाजातील समस्या जीवंत करण्यास दिग्दर्शकांना यश ही येत आहे. असाच एक मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचे नाव ‘म्होरक्या’ असे आहे. ‘म्होरक्या’ म्हणजे नेता, लीडर जो सगळ्यांना पुढे नेतो अथवा प्रतिनिधीत्व करतो. हिच या चित्रपटाची गोष्ट आहे. या चित्रपटात रमण देवधर, यशराज कऱ्हाडे, अमर देवधर, ऐश्वर्या कांबळे, रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर देवधर यांनी केले आहे. अमर यांचा दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे.
काय आहे चित्रपटाची गोष्ट?
दरम्यान, ‘म्होरक्या’ या चित्रपटाची गोष्ट आगळ गावात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील अशोक उर्फ आश्याची (रमण देवकर) आहे. आश्या हा सातवीत शिकत असूनही शाळेत जाण्यास उत्सुक नसलेला दिवसभर मेढ्यांच्या कळपात रमणार असतो. आश्याला एक दिवस त्याचे मित्र जबरदस्तीने शाळेत घेऊन जातात. त्याच वेळी काही दिवसांवर येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी शाळेत चालू झालेली असते. मेढ्यांच्या कळपाला डोंगरदऱ्यातून घेऊन जाणाऱ्या आश्याचा आवाज खणखणित असतो. त्यामुळे परेडमधील आश्याचा आवाज सगळ्यांचे लक्षवेधून घेतो. त्याचा आवाज खणखणीत असल्याने परेडच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत येतो. त्या स्पर्धेत त्याला गावाच्या पाटल्याच्या पोऱ्याच्या रोशाला सामोरे जावे लागते. पण जर परेडचे म्होरकेपद मिळावायचे असेल तर नेहमी शाळेत येण्याची अट शिक्षक आश्याला घालतात. मात्र, कुटुंबाची आर्थिकस्थिती चांगली नसल्याने त्याला दिवसभर मेंढ्या पाळण्याचे काम करणे गरजेचे असते. त्यामुळे त्याला शाळेत जाणे शक्य होत नाही, पण परेडच्या तांत्रिक बाबा शिकल्याशिवाय म्होरक्या होऊ शकणार नाही अश्या विचित्र दुविधा मनस्थितीत तो अडकतो. त्याच गावात कारगिर युद्धात लढलेल्या पण गावातल्यानी नागरिकांनी गद्दार घोषित केलेले स्किझोफ्रेनिक अण्णा (अमर देवकर) नावाचा सैनिक असतो. आश्या त्या सैनिकाकडून परेडचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतो आणि शाळेतील म्होरकेपद मिळवतो. पण आता प्रजासत्ताक दिनी आश्या त्याचे म्होरकेपद कायम ठेवतो का? त्याच्याकडून म्होरकेपदाने नवीन दुष्टी मिळते का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच पण त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
अभिनय आणि दिग्दर्शनाबद्दल
हि गोष्ट परेडच्या म्होरकेपदा भोवती फिरणारी खुर्चीला खिळवून ठेवणारी गोष्ट आहे. तसेच या चित्रपटाचे संवाद चटपटीत असून चित्रपटाच्या कथेला न्याय देणारी आहेत. तसेच आश्याची भूमिका साकारणाऱ्या रमण देवकरने त्याची भूमिका उत्तमरित्या निभवून नेली आहे. दिग्दर्शनाबद्दल म्हणायचे झाले तर दिग्दर्शक अमर देवधर यांचा हा पहिला चित्रपट असला तरी त्याने उत्तमरित्या दिग्दर्शन केले आहे.