दरवर्षी भरणार्या आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून असंख्य चाकरमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या महिन्यात कोकणात जाणाऱ्या गाड्यामध्ये गर्दी उसळलेली असते. या गर्दीपासून बचावासाठी तुम्हाला या गाड्यांचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या या गाड्या नेमक्या आहेत कुठल्या त्या.
यंदा आंगणेवाडीतील भराडीदेवीचा उत्सव १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे. या जत्रेसाठी मुंबईहून असंख्य भाविक जात असतात. त्यामुळे रेल्वे गाड्यामध्ये भयंकर गर्दी जमत असते. मात्र या महिन्यात तुम्हाला या पर्यायी गाड्यांचा प्रवासासाठी वापर करता येणार आहे. या गाड्या गुजरातच्या वलसाड मधून केरलाच्या कोचुवेली, तिरुनवेल्ली व आणखी काही स्थानकांपर्यत चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांचा थांबा कोकणातील काही स्थानकात हि असणार आहे. तसेच या गाड्यांना तीन अतिरिक्त डबेहि जोडण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फायदा चाकरमान्याना होणार आहे.
या आहेत २३ डब्यांच्या गाड्या
रेल्वे प्रशासनाने ४ साप्ताहिक गाड्यांना तीन अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भावनगर-कोचुवेली पोरबंदर-कोचुवली, जामनगर-तिरुनवेल्ली, हाप्पा-मडगाव या साप्ताहिक गाड्यांना ६ फेब्रुवारीपासून एका वातानुकूलित डब्यासह दोन स्लीपर जोडण्यात येणार असून या गाड्या २३ डब्यांच्या धावणार आहेत.
अशा धावणार
- भावनगर-कोचुवेली : १९२६० भावनगर-कोचुवेली हि साप्ताहिक गाडी २५ फेब्रुवारीपर्यंतच्या प्रत्येक मंगळवारी धावणार. परतीच्या प्रवासात १९२५९ क्रमांकाची ही गाडी दर गुरुवारी २७ फेब्रुवारी या दरम्यान धावेल.
- कोचुवेली-पोरबंदर : १९२६१ क्रमांकाची कोचुवेली-पोरबंदर दर रविवारी ९ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान धावणार.
परतीच्या प्रवासात १९२६०२ क्रमांकाची ही गाडी दर गुरुवारी ६ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान धावणार आहे. - जामनगर-तिरुनवेल्ली एक्सप्रेस : १९५७८ या क्रमांकाची जामनगर-तिरुनवेल्ली एक्सप्रेस गाडी शुक्रवार व शनिवार २९ फेब्रुवारी पर्यंत ३ अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी व मंगळवारी ३ मार्चपर्यंत धावेल.
- हाप्पा-मडगाव : २२९०८ या क्रमांकाची हाप्पा-मडगाव ही साप्ताहिक गाडी दर गुरुवारी ६ ते २७ फेब्रुवारी तर परतीच्या प्रवासात २२९०७ क्रमांकाची ही गाडी दर शुक्रवारी ते २८ फेबुरवारी या दरम्यान २३ डब्यांची धावणार आहे.