चीन या देशातुन सुरु झालेला कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. या व्हायरसवर अद्यापही कोणतेही औषध बनवण्यात यश आलेले नाही. कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्याने जगभरातील देश चीन मधल्या आपल्या देशातील नागरिकांना परत आणत आहेत. अनेक देशांनी चीनच्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. चीनच्या वुहान प्रांतात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आहेत. चीन ने या संसर्ग जन्य कोरोना समोर हात टेकले असून आतापर्यंत 30 हजाराहुन अधिक चीनी नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोना व्हायरस मुळे आतापर्यंत 600 हुन अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशात एका वृद्ध जोडप्याचा मन हेलावणारा व्हिडिओ समोर आला आहे.
मन हेलावणारा व्हिडिओ
कोरोना व्हायरसवर पुर्णपणे बर करणारे कोणतेही औषध आतापर्यंत नसल्याने चीनमध्ये कोरोना झालेल्या माणसांना कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही, अशीच परिस्थिती आहे. अशातच कोरोना व्हायरस झालेल एक वृद्ध दाम्पत्य रुग्णालयात दाखल असून, त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्या दोघांनीही मास्क घातलेले आहेत. तसेच दोघांना एकमेकां शेजारच्या बेडवर ठेवण्यात आले आहे. या आजारामुळे आपला मृत्यू कधी ओढवेल हे सांगता येत नसल्याने ते दोघेही अखेरचे क्षण एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांकडे दु:खी डोळ्यांनी बघत असल्याचा मन हेलावणारा हा व्हिडिओ आहे.
What does a couple mean? Two elderly patients of #coronavirus #CoronarivusOutbreak in their 80s said goodbye in ICU, this could be the last time to meet and greet 😭😭😭 pic.twitter.com/YKQIUM3YXJ
— Incoming Memes (@incoming_memes) February 2, 2020
दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे वृद्ध जोडपे 80 वर्षांचे आहे. अनेकांनी त्यांच्या आयुष्याची प्रार्थना करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. सध्या चीनमध्ये सर्वत्र लोक मास्क घालुन फिरत असून, अनेक डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून, एक डॉक्टर पिता आपले वैद्यकीय कर्तव्य पुर्ण करण्यासाठी घरातून निघताना त्याच्या मुलीला बाय करत आहे. कदाचीत तो घेत असलेला निरोप शेवटचाही असून शकतो. असे अनेक मन हेलावणारे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.