पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोराविरुद्ध मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट वांद्र्यात पोस्टरबाजी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान केले आहे. या आव्हानावर अद्याप शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली नाही आहे.
घुसखोरांविरोधात येत्या रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. मनसेच्या महाशिबिरातच राज ठाकरेंनी त्याबाबत घोषणा केली होती. याच मोर्चाचा एक भाग म्हणून मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर पोस्टर लावले आहे.
या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री साहेब घुसखोरांना हाकलण्याची खरच तुमची इच्छा असेल तर आधी तुमच्या वांद्र्यातल्या अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असं म्हटले आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अखिल अनिल चित्रे यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमधून थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यामध्ये या मोर्चाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. आहेत. तसेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आता भाजप कामाला लागलं असून मनसेच्या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार असण्याची शक्यता आहे.