सध्या प्रत्येकांच्या घरात असो वा सोशल मीडियावर हिंदी बिग बॉस पर्व 13ची चर्चा रंगलेली दिसते. बिग बॉस हा शो छोट्या पडद्यावरिल असला तरी लोकप्रिय शो आहे. या पर्वातील स्पर्धकांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. मात्र, या पर्वात सिद्धार्थ शुक्ला याचेकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून बिग बॉसच्या घरातील वर्तवणूकीमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. तर आता बिग बॉस व्यतिरिक्त एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे तो चर्चेत आला आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सिद्धार्थ शर्माला पोलिस पकडून व्हॅनमध्ये बसवत असल्याचे दिसत आहे. मात्र, एका वृत्त संस्थेनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ जूना असून 22 जुलै 2018 चा असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी सिद्धार्थवर वेगात कार चालवण्याचा आरोप करण्यात आला होता. सिद्धार्थच्या कारचा वेग इतका होता की त्याचा कारवरचा ताबा सुटल्याने 3 गाड्यांना धडक दिली होती. या धडकेत सिद्धार्थला दुखापत झाली नसली तरी इतर तिघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचे म्हंटले जात आहे. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ ‘व्हायरल बॉलिवूड’ या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.