Ads
टेक- टॉक

खरेदीची संधी; ‘Samsung’च्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमतीत कपात   

samsung-galaxy
डेस्क desk team

स्मार्टफोन बाजारात सध्या दमदार फीचर्स असणारे स्मार्टफोन येत आहेत. स्मार्टफोन बनवणाऱ्या अनेक कंपन्या असल्याने स्पर्धाही वाढल्याचे दिसते. तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स घेऊन येतात. अशीच जबरदस्त ऑफर लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Samsung आपल्या स्मार्टफोनवर 3 हजारांची कपात केली आहे. किंमतीत कपात केलेल्या स्मार्टफोनचे नाव Galaxy A70s असे आहे. काही दिवसांपूर्वी याच स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने बदल केला होता, तर आता किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीची उत्तम संधी कंपनीने दिली आहे. तसेच या स्मार्टफोनची खरेदी ग्राहकांना Samsung ऑनलाइन स्टोअर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे.

फीचर्स

  • 6.7 इंच AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले
  • 2.0GHz ऑक्टोकॉर प्रोसेसर
  • Android pie वन यू आय (one UI) टेक्नॉलॉजीवर आधारीत
  • फिंगरप्रिंट सेन्सर
  • 32+8+5 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
  • सेल्फीसाठी 32 मेगापिक्लचा कॅमेरा
  • 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज अशा दोन पर्यायासह उपलब्ध
  • 4500 एमएएच इतका बॅटरी बॅकअप

किंमत

  • Galaxy A70s स्मार्टफोन करते वेळी या स्मार्टफोनची किंमत 28,999 रूपये इतकी असलेल्या 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 25,999 रूपयात खरेदी करता येणार.
  • 8 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटचा स्मार्टफोन 27,999 रूपयांत खरेदी करता येणार.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: