न्यूझीलंड दौऱ्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 5-0 अशी भारतीय संघाने जिंकली असली तरी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. प्रथम फलंदाजी करून न्यूझीलंड संघासमोर 347 धावांचा डोंगर उभा करूनही भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर आयसीसीच्या कारवाईला भारतीय संघाला संमोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड दौऱ्यात आयसीसीने भारतीय संघावर केलेली ही तिसरी कारवाई असणार आहे.
आयसीसीने केलेली कारवाई वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने धीम्या गतीने षटके टाकल्यामुळे करण्यात आली आहे. यावेळी आयसीसीने संघाला सामान्यातील 80 टक्के इतका दंड केला आहे. या दौऱ्यातील धीम्या गतीने षटके टाकल्याने कारवाई केल्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टी-20 सामन्यात दोनवेळा याच कारणामुळे भारतीय संघाला दंड झाला होते.
भारतीय संघाने नियमीत वेळेपेक्षा चार षटके अधिक वेळ घेतला असल्याने हा दंड केला आहे. आयसीसीच्या नियमानुसार 2.22 अशा निश्चित वेळेनंतर जितकी षटके टाकली जातील त्या प्रत्येत षटकांसाठी 20 टक्के दंड केला जातो, असे आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सांगितले आहे. आयसीसीने केलेली कारवाई भारतीय कर्णधार विराट कोहलीने मान्य केली असल्याने या प्रकरणी कोणतीही सुनावणी होणार नसल्याचेही आयसीसीने सांगितले आहे.