अमेरिकेमधील ओहियो येथील ट्विन्सबर्ग येथे राहणाऱ्या डेन केइनला एका लोन कंपनीने तब्बल 55 हजार पेमेंट स्टेटमेंट पत्र पोस्टाने पाठवल्याचे उघडकीस आले आहे.
कंपनीला खर्च : डेन केइन यांच्या मुलीच्या कॉलेज ट्यूशन लोक कंपनीने ही पत्रे पाठवली. ही पत्रे पाहून केन यांचे कुटुंब हैराण झाले. ही पत्रे 79 बॉक्समध्ये होती. कंपनीला या पत्रांसाठी 21 लाख रुपये खर्च आला.
केइनला पोस्टमनने सांगितले : आलेली असंख्य पत्रे पोस्ट ऑफिसमध्ये ठेवली आहेत. त्यानंतर केन यांनी दोनवेळा ट्रक भरून पत्रे आणून आपल्या गॅरेजमध्ये ठेवली. माध्यमांत बातमी आल्यानंतर कॉलेज एवेन्यू स्टूडेंट लोन कंपनीने आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.
केइन म्हणाले : हे पेमेंट स्टेटमेंट लोन कंपनीने कर्जाचे चुकीचे व्याज जोडल्याने पाठवले आहे. मात्र कंपनीने केइनचे आरोप फेटाळले आहेत. कंपनीने याला डुप्लिकेटिंग मेल सिस्टमची चुकी मानली असून, पत्र लवकरच परत घेणार असल्याचे सांगितले.
कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर टिम स्टेले म्हणाले : आम्ही डेनसोबत मिळून हे प्रकरण मिटवत आहोत. लवकरच सर्व पत्रे परत घेतली जातील.