उत्तर प्रदेशमधील रामपूरचे अखेरचे शासक नवाब रजा अली खां यांच्या संपत्ती वाटपाच्या प्रक्रियेंतर्गत जुने शस्त्रागार उघडले. शस्त्रागारामध्ये सोने व चांदी जडित शस्त्रास्त्र सापडली आहेत. पहिल्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले नसून, आणखी दोन दिवस हे काम सुरु राहणार आहे.
कमिटीत सहभाग : जिल्हा न्यायालयाने हे शस्त्रागार उघडण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार सिंह यांनी यासाठी एसडीएम पुंडीर, सीओ विद्या शुक्ल व शस्त्रांची माहिती असलेले राशिद खां तसेच आमिर खां यांना कमेटीमध्ये सहभागी केले होते.
वकिल कमिश्नर मुजम्मिल हुसैन व सौरभ सक्सेना यांनी कमेटीच्या उपस्थितीमध्ये शस्त्रागाराचे टाळे उघडले. त्यावेळी नवाब घराण्याचे सदस्य देखील होते. यामध्ये पेटी व कपाटात मौल्यवान शस्त्रसाठा होता. .
400 शस्त्रास्त्र : पहिल्या दिवशी सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने अजून दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी 400 शस्त्रास्त्र मिळाले. तलवारी, खंजीर, भाले, पिस्तूल, बंदूक, रायफल आणि अन्य असे हजारो शस्त्र सापडले.