Ads
मनोरंजन

श्रृती हासनसह रुपवान अभिनेत्री बनल्या पेंटींग कॅलेंडर्सच्या सुंदर मॉडेल्स

डेस्क desk team

ख्यातनाम फोटोग्राफर जी. वेंकटराम यांनी यंदाच्या अनोख्या कॅलेंडरचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या पेंटींग्जची निवड केली होती. यासाठी जी. वेंकटराम यांनी प्रसिध्द 12 नायिकांची निवड केली.

12 सौंदर्यवती राजा रवी वर्मांच्या जगप्रसिध्द चित्रांसारख्या या कॅलेंडरमध्ये दिसत आहेत. इथे जी. वेंकटरामन यांच्या फोटोंची कमाल दिसून येते. सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन, दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि बाहुबली चित्रपटातील सौंदर्यवती रम्या कृष्णन यासारख्या लोकप्रिय नायिकांचा समावेश आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री नादिया, अभिनेत्री खूशबू सुंदर, भरत नाट्य डान्सर शोभना आणि प्रियदर्शी या रुपवतींचा कलेंडरच्या फोटोंमध्ये समावेश आहे.

View this post on Instagram

G Venket Ram – Calendar 2020 for Naam – Recreating Raja Ravi Varma An expectant mother holding a fruit symbolic of a new life, portrayed by @samantharuthprabhuoffl #naamct #gvenketram #gvenketramphotography #recreatingrajaravivarma #gappigopi #rajaravivarma The Raja Ravi Varma Heritage Foundation Credits: Concept: Suhasini Maniratnam @suhasinihasan & G Venket Ram @venketramg for Naam Charitable Trust Photography: G Venket Ram @venketramg Post-production: Disha Shah @disha_dee Styling: Amritha Ram @amritha.ram Make-up & Hair: Sadhna Singh @sadhnasingh1 @koduruamarnath Calendar Design: Padmaja Venket Ram @padmajav Jewellery courtesy: @princejewelleryindia @jozzspprince . Event PR: @theglassbox.chennai @supriya0913 @sonalikuruvilla Launch: The Folly, @amethystchennai . #rajaravivarmapainting #calendar2020 #calendar #photography #fineart #fineartphotography #photographyislife #lensculture

A post shared by G.Venket Ram (@venketramg) on

 या कलाकारांसोबत प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री ऐश्वर्या राजेश, मल्याळम अभिनेत्री लिसी लक्ष्मी आणि निर्माती अभिनेत्री लक्ष्मी मंचू यांच्याही फोटोंचा कॅलेंडरमध्ये समावेश आहे.या सर्व रुपवान अभिनेत्री मॉडेल्सनी जी वेंकटरमन यांच्या फोटोशूटमध्ये भाग घेत उत्तम कॅलेंडरच्या निर्मितीत सहभाग घेतला.

जी. वेंकटरमन यांच्या या फोटोग्राफीला सर्वच स्तरातून दाद मिळत आहे. राजा रवी वर्मांची जशी चित्रे आहेत तसेच या फोटोंचे रिक्रियशन करण्यात आलंय.

View this post on Instagram

G Venket Ram – Calendar 2020 for Naam – Recreating Raja Ravi Varma Kadambari, a portrait of a modern, intellectual Bengali lady, portrayed by Priyadarshini Govind. #naamct #gvenketram #gvenketramphotography #recreatingrajaravivarma #gappigopi #rajaravivarma The Raja Ravi Varma Heritage Foundation Credits: Concept: Suhasini Maniratnam @suhasinihasan & G Venket Ram @venketramg for Naam Charitable Trust Photography: G Venket Ram @venketramg Post-production: Disha Shah @disha_dee Styling: Neeta Lulla @neeta_lulla Calendar Design: Padmaja Venket Ram @padmajav Jewellery courtesy: @princejewelleryindia @jozzspprince Event PR: @theglassbox.chennai @supriya0913 @sonalikuruvilla Launch: The Folly, @amethystchennai . . #rajaravivarmapainting #calendar2020 #calendar #photography #fineart #fineartphotography #photographyislife #lensculture

A post shared by G.Venket Ram (@venketramg) on

दक्षिणेतील लोकप्रिय दिग्दर्शक मनी रत्नम यांच्या पत्नी सुहासिनी यांच्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी या कॅलेंडरची निर्मिती करण्यात आलीय. सर्वच अभिनेत्रींना फोटोग्राफर जी. वेंकटरमन यांना या कॅलेंडरबद्दल धन्यवाद दिले आहेत.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: